आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही झालो मतदार..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘दिव्य मराठी’ आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे तरुणांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी महाविद्यालयांमध्येच मतदार नावनोंदणीची संधी उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारी के. के. वाघ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सकाळी 8 पासूनच प्रत्यक्ष नोंदणीस सुरुवात करण्यात आली. त्याला लाभलेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हे अभियान अधिकाधिकनोंदणी करण्याच्या फलर्शुतीच्या दिशेऩ्ो वाटचाल करीत असल्याचे दिसून आले.

प्राचार्य डॉ. व्ही. शेवळीकर, अभियानाच्या नोडल अधिकारी पद्मिनी बोरसे, ‘आर्ट ऑफ लिव्हिग’चे स्वयंसेवक राहुल पाटील यांनी गुरुवारी विद्यार्थी प्रतिनिधींना या अभियानाची माहिती दिली होती. संबंधित प्रतिनिधींनीही विद्यार्थ्यांना माहिती दिल्याने शुक्रवारी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणत अर्ज जमा केले. निवडणूक आयोगाने विद्यापीठांच्या कुलसचिवांमार्फत प्राचार्यांवरच विद्यार्थ्यांची मतदारयादीत नावे नोंदविण्याची जबाबदारी निश्चित केलेली आहे.

प्रतिनिधींचा उत्साह
नोंदणीसंदर्भात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे प्रथम वर्गप्रतिनिधींची बैठक घेत त्यांना अर्ज भरण्यासंदर्भातील माहिती देण्यात आली. वर्गप्रतिनिधीने वर्गावर्गांत विद्यार्थ्यांना माहिती दिली. शुक्रवारी महाविद्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांना केवळ अर्जच वितरित न करता त्यांच्याकडून ते भरूनही घेतले. अर्ज भरण्यासाठी आलेल्या अडचणी दूर करत त्यांना अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शनही केले.

प्राध्यापकांनीही घेतले अर्ज
विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या अभियानातून धडा घेत मतदारयादीत नाव नसलेल्या प्राध्यापकांनीही नाव नोंदविण्यासाठी पुढाकार घेतला. महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या स्वाक्षरीने केवळ विद्यार्थ्यांचेच अर्ज स्वीकारले जाणार असल्याने त्यांनी प्रक्रिया समजावून घेतली. उपलब्ध असलेले नावनोंदणीचे अर्जही घेतले. ते कुठे भरावयाचे याची माहिती घेत घराजवळील मतदार नोंदणी केंद्रात अर्ज जमा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इतर फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांचा उत्साह
के. के. वाघ एज्युकेशन कॅम्पस्मधीलच कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात नोंदणी सुरू असतानाच कृषी अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनीही पुढाकार घेतला. त्यांनी या प्रक्रियेची माहिती राहुल पाटील यांच्याकडून घेतली. विद्यार्थ्यांनी शनिवारी कागदपत्रे आणण्याचे आश्वासनही दिले. या वेळी ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे होती त्यांनी शेजारच्याच इमारतीत जाऊन अर्जही भरून दिले.

एनबीटी, नाईक कॉलेजला नोंदणी
शनिवारी (दि. 12) एनबीटी लॉ कॉलेज व व्ही. एन. नाईक महाविद्यालयात अभियान राबविण्यात येणार आहे. सकाळी 10 ला लॉ कॉलेजमध्ये अर्ज वितरणासह अर्जही भरून घेतले जाणार आहेत. नाईक महाविद्यालयात दुपारी दीडला प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन महाविद्यालय आणि ‘दिव्य मराठी’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे करण्यात आले आहे.

उपयुक्त अभियान
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ठीक आहे. मात्र, येथे तर तिसर्‍या- चौथ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनीही नाव नोंदविले नसल्याचे आढळले. त्यासाठी हे अभियान उपयुक्त असून, सर्वच विद्यार्थ्यांना नाव नोंदविण्यासाठी आवाहन केले आहे. चंद्रकांत दालभगत, प्राचार्य

इतरांसाठीही प्रयत्नशील
मतदान करणे हा आपला हक्क आहे. तुम्ही मतदानच केले नाही, तर लोकप्रतिनिधींना जबाबदारही ठरवू शकणार नाही. त्यामुळे स्वत:चे नाव नोंदविण्यासह इतर मित्र-मैत्रिणींनाही मी त्यासाठी आग्रह करीत आहे. ऋतुजा पेखळे, विद्यार्थिनी

विद्यार्थ्यांचे सहकार्य
विद्यार्थ्यांना या अभियानांतर्गत मतदारयादीत नावनोंदणीसाठी आग्रह धरत असून, स्वत:देखील विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेणार आहे. विद्यार्थ्यांनीही आवश्यक कागदपत्रे आणून त्वरित नावनोंदणी करावी. अश्विनी पवार, विद्यार्थिनी

अभियानामुळेच मतदार
मतदारयादीत आमचे नावच नसल्यामुळे या संधीचा लाभ घेता येत नव्हता. ‘दिव्य मराठी’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मुळे ही संधी उपलब्ध झाली असून, इतर विद्यार्थ्यांनाही नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. सुवर्णसिंह पाटील, विद्यापीठ प्रतिनिधी