आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया झाला मतदार जागृतीसाठी सक्रिय, विविध संस्थांकडून संदेश देत केला जातोय जागर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सोमवारी सायंकाळी विधानसभा प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटरवरून मतदानाचा टक्का वाढण्यासाठी विविध मेसेज आणि व्हिडिओंच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 'वोट फॉर बेटर इंडिया' कॅम्पेनसह काहींनी व्यक्तिगत, तर काही संस्थांनी तयार केलेले वोट फॉर बेटर महाराष्ट्र टॅग लाईनच्या व्हिडिओंनी मतदारांचे लक्ष वेधले.

निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध संस्थांनी सोशल मीडियावर संदेश देण्यात आघाडी घेतल्याचे िदसत आहे. तर, दुसरीकडे िनवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोमवारी सायंकाळी प्रचार थांबला असला आणि सोशल मीडियावरून अशा प्रकारचा प्रचार करण्यास मनाई असली तरी काही उमेदवारांच्या समर्थकांनी मात्र व्हॉट‌्सअ‍ॅपवरून िदवसभर प्रचार सुरूच ठेवल्याचे िदसून आले. याबाबत कोणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यास मात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, असे िजल्हाधिकाऱ्यांसमवेतच्या पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. परंतु, तक्रार देण्यास अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. अशा प्रकारची तक्रार आल्यास गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.

मतदारांत वाढतेय जागृती
ह्यमतदान आपला घटनात्मक हक्क असून, तो बजावलाच पाहिजेह्ण, असे संदेश देणारे शेकडो मेसेजेस व्हॉट‌्सअ‍ॅप, फेसबुकवरून दोन िदवसांपासून सुरू झाले आहेत. ह्यहर करम अपना करेंगे, वतन तेरे लिए या गाण्याने सजलेला आणि मतदान करण्यास प्रोत्साहन देणारा ह्यआर्ट ऑफ लिव्हिंगचा व्हिडिओ मतदारांची मने जिंकत आहे. ' यंदा कर्तव्य आहे' अशा आशयाच्या लग्नपत्रिकाही मतदारांना मतदानाला जाण्याबाबत आठवण करून देत आहेत. तत्काळ पोहोचणाऱ्या संदेशातून मतदान करून बदल घडवून आणण्याचा संदेश दिला जात आहे.
मतदानास प्रोत्साहित करताहेत मेसेजेस
ह्यपूर्ण झाले अठरा वय, मतदानाची झाली सोयह्ण, ह्यआपणच घडवू आपले भवितव्य, मतदानाचे बजावून कर्तव्यह्ण, ह्यएकच नारा, शंभर टक्के मतदान कराह्ण. ह्यओ भाऊ, मी मतदान करनार, तुमी पन कराह्ण, ह्यआपका एक सही वोट मतलब देश की अनेको समस्याओं से छुटकाराह्ण, ह्यमतदान मेरा अधिकार, मतदान मेरी जिम्मेदारी, अशा विविध आकर्षक मेसेजेसचा बोलबाला सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे. आलेल्या या मेसेजची चर्चा रंगत आहे. तरुणांमध्ये याची विशेष चर्चा आहे.