आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाख 32 हजार ‘दुबार’ मतदारांना नोटीस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- एकाच मतदाराची दुबार नावे कमी करण्यासाठीच्या मोहिमेंतर्गत आढळलेल्या संभाव्य एक लाख 32 हजार मतदारांना जिल्हा निवडणूक शाखेने नोटीस देत नाव का कमी करू नये, यासंदर्भात खुलासा मागविला आहे.

जिल्हा व शहरात 38 लाख 99 हजार 681 मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द झाली. त्यातील एक लाख 32 हजार संभाव्य दुबार नावे आढळली. आगामी निवडणुकीसाठी 1 एप्रिलपासून जिल्ह्यात 19 मतदार मदत केंद्रे कार्यरत होणार असून, तेथे मतदारांच्या अडचणी सोडविल्या जातील.

यादी निवडणूक आयुक्तांमार्फतच
मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालय दुबार नावांची यादी जिल्हा निवडणूक विभागास देणार आहे. त्यामुळे ही नावे कमी करणे सोपे होईल. मतदारांनी दुबार नावे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
-गीतांजली बाविस्कर,निवडणूक उपजिल्हाधिकारी