आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voter News In Marathi, Blind People, Lok Sabha Election, Divya Marathi

अंध मतदारांसाठी उद्या प्रथमच कार्यशाळा,देशातील पहिलाच प्रयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मतदारांचे प्रबोधन करण्यासाठी प्रथमच आयोगातर्फे मोठय़ा प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे असून, आता अंध व्यक्तींसाठीही नाशिक जिल्हा निवडणूक विभाग आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने कार्यशाळा होणार आहे. अंधांसाठी अशी कार्यशाळा घेणे हा देशातील पहिलाच उपक्रम आहे.


ही कार्यशाळा शुक्रवारी (दि. 18) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यासाठी अंध बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


मतदान प्रक्रियेपासून वंचित राहणारा तरुण, महिला, उच्चभ्रू वर्ग यांच्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि ‘दिव्य मराठी’ने नावनोंदणीपासून ते मतदान करण्यापर्यंत सर्वच बाबींसाठी मतदारांना आवाहन करत त्यांना आपल्या एका मताचे महत्त्व पटवून दिले आहे. मात्र, शंभर टक्के मतदान हा निवडणूक आयोगाचा अजेंडा असल्याने समाजातील सर्वच थराला यात सहभागी करून घेणे आवश्यक असून, त्याच अनुषंगाने अनिष मसरानी यांच्या कल्पनेनुसार निवडणूक विभागाने अंधांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यात त्यांना मतदान करणे किती गरजेचे आहे याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभाग आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने करण्यात आले आहे.