आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार नोंदणीसाठी आज अंतिम मुदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विधानसभानिवडणुकीसाठी मतदान नोंदणीची अंतिम मुदत बुधवारी संपत आहे. त्यामुळे अजूनही नावाची नोंदणी केलेल्यांनी आज(दि.१७)च आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीत करावी, अन्यथा विधानसभा निवडणुकीतील मतदानापासून वंचित राहण्याची वेळ संबंधित मतदारांवर येणार आहे.

या निवडणुकीसाठी २७ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत आहे. त्याच्या दहा दिवस आधीपर्यंत म्हणजे बुधवारी सायंकाळी वाजेपर्यंत अद्यापही ज्यांनी नाव नोंदणी केली नसेल अशांनी आपले अर्ज योग्य कागदपत्रांसह विधानसभा मतदारसंघ कार्यालयात जमा करावे.

हीकागदपत्रे हवी : एकरहिवासी पुरावा (रेशनकार्ड, वीज वा फोन बिल), फोटो ओळखपत्र (लायसन्स, आधारकार्ड, पॅनकार्ड), जन्माचापुरावा : शाळेचादाखला, दहावीचे जन्मतारीख असलेले प्रमाणपत्र.
नोंदणी ऑनलाइनही
निवडणूकआयोगाच्या www.eci.nic.in संकेतस्थळावरील राज्य निवडणूक आयोगाच्या नावनोंदणी पर्यायावर नोंदणी करता येईल किंवा ceo.maharastra.gov.in यावर अर्ज भरून तो स्थानिक मतदान केंद्रात जमा करावा लागेल.