आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाव नोंदणीसाठी मतदार ऐनवेळी झाले जागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मतदाननोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष केलेल्या मतदार बुधवारी नावनोंदणीच्या शेवटच्या दिवशी जागे झाले. विधानसभेला तरी मतदान करता यावे यासाठी नावे नोंदणी करण्यासाठी नोंदणी ताेबा गर्दी झाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही धावपळ होत होती.

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून, २० सप्टेंबरपासून अधिसूचनाही जारी केली जाईल. त्यानंतर २७ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवसाच्या दहा दिवस आधीच मतदान नोंदणीची मुदत असते. त्यानुसार १७ सप्टेंबर ही मतदार यादीत नाव नोंदविण्याची अखेरची मुदत होती. त्यामुळे. मतदारांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणीसाठी गर्दी केली होती.

पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघाच्या नावे नोंदणीसाठी असलेल्या कार्यालयासमोर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कसेही करून आज नावनोंदणी करायचीच असाच चंग बांधून जणू सर्वच मतदार नाव नोंदणीसाठी आल्याने उन्हाचाही विचार करत केव्हा अर्ज जमा करतोय अशीच त्यांची अवस्था झाली होती. नियमानुसार कुठलेही नाव मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी त्याची चौकशी करणे आवश्यक असून, त्यासाठी दहा दिवसांचा कालावधी आवश्यक असल्यानेच बुधवारी सर्व कागदपत्रांनिशी अर्ज सादर केलेल्यांचीच नावे यादीत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अनेकांचा झाला हिरमोठ्याड
मुदतीच्याअखेरच्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि.१७) केवळ नव्याने नाव नोंदणीचीच प्रक्रिया केली जाणार असल्याने नाव पत्त्यात बदल, फोटो बदल, सेशन कार्ड किंवा नाव कमी करण्यासारख्या कुठल्याही बाबींचे आता काम होणार नसल्याने अनेकांचा हिरमोडही यावेळी झाला.
संकेतस्थळ जॅम
नावनोंदणीचे अर्ज जमा केल्यानंतर त्यांच्या यादीत समावेश झाला की नाही, याची तपासणी ऑनलाइन करण्यासाठी संकेत स्थळाला भेट दिली असता अनेकांना तर संकेतस्थळ जॅम असल्याचा अनुभव आला. काहींची नावे ऑनलाइन दिसत नसताना त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच तपासणी केली असता नाव यादीत असल्याचे आढळून आले.
कार्यालयास जत्रेचे स्वरूप
मतदारांनीनाव नोंदणीसाठी केलेली गर्दी तसेच तेथेच अर्ज घेऊन लागलीच तो भरण्यासाठीही गार्डनमध्ये तसेच मिळेल त्या ठिकाणी ठाण मांडत मतदारांनी अर्ज भरले. लागलीच ते आप-आपल्या मतदारसंघांसाठी असलेल्या कार्यालयांमध्ये जमाही करण्यासाठी लगबग होती. अनेक महिला आपल्या चिल्ल्यापिल्यांसह उपस्थित होत्या. त्यामुळे जणू जिल्हाधिकारी कार्यालयास यात्रेचेच स्वरूप प्राप्त झाले होते.

प्रशासनाची चूक
कार्डअसूनही मतदार यादीत नाव नाही असा सावळागोंधळ प्रशासनाने घातलेला आहे. लोकसभेच्या वेळी नाव नोंदवूनही यादीत ते आलेच नाही. आता येथे ऐनवेळी आता नोंदणीसाठी यावे लागले आहे. समिताकाळे, मतदार