आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voter Registration Issue At Nashik, Divya Marathi

मतदार नोंदणीसाठी सरसावला भाजप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लोकसभा निवडणूक काळात बहुतांश मतदारांची नावे गहाळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपतर्फे मतदार नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या नवमतदारांचे नाव आले नव्हते अशांनी फॉर्म नंबर 6 भरून नोंदणी करण्याचे आवाहन सरचिटणीस सुनील केदार यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस विजयानंतर भपकेबाज आनंदोत्सवास फाटा देत पदाधिकार्‍यांनी विधानसभेवर लक्ष केंद्रित केले आहे. याचे पहिले पाऊल मतदार नोंदणी अभियानद्वारे टाकण्यात आले आहे. योग्य लोकप्रतिनिधी आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. या मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

येथे करा नोंदणी : फॉर्म 6 भरून शाळा, तलाठी, तहसील कार्यालय आणि निवडणूक शाखा येथे नोंदणी केली जाते. रहिवासी दाखला, ओळखपत्र, दोन फोटो आदी कागदपत्राद्वारे नोंदणी करण्यात येते.