आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विशेष मतदार नोंदणीस अल्प प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नवीन मतदार नोंदणीस शहरातच नव्हे जिल्हाभरात अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. ‘दिव्य मराठी’च्या चमूने शहरातील काही केंद्रांवर पाहणी केली असता सकाळी 10.30 ते 11.30 या एक तासात काही प्रमाणात गर्दी दिसून आली. त्यानंतर मात्र दिवसभर अनेक केंद्रांवर मतदान केंद्र कर्मचारी अक्षरश: बसून असल्याचे चित्र पाहायला मिळाले.मतदानापासून वंचित राहण्याची वेळ विधानसभा निवडणुकीत कोणावरही येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने 9 जूनपासून विशेष मतदार पुनरीक्षण मोहीम सुरू केली.
मात्र 16 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने ज्या शाळांवर नोंदणी केंद्र आहेत तेथे शाळा सुरू झाल्यानंतरच अर्ज उपलब्ध झाले, 9 ते 16 जूनपर्यंत अनेकांना अर्ज उपलब्ध झाले नसल्याचे व बूथस्तरीय अधिकारी उपस्थित नसल्याचे चित्र होते. 16 जूननंतर मात्र जिल्हाभरात नोंदणी सुरू आहे. नवीन नोंदणीसह तर पत्ता व नावात बदल, यांसारख्या प्रक्रियांकरिता अर्ज भरून घेतले जात आहेत. तहसील कार्यालये, पदनिर्देशित ठिकाणे व मतदान केंद्रांवर अर्ज उपलब्ध आहेत.
मित्रांनो, मतदान हा आपला घटनात्मक हक्क आहे. यासाठी मतदारयादीत आपले नाव असणे गरजेचे आहे. सध्या मतदार नावनोंदणी सुरू असून (दि. 22) रविवार हा सुटीचा वार असूनही आज मतदार नोंदणी सुरू राहणार आहे. तुमच्या जवळच्या मतदान केंद्रावर ही प्रक्रिया सुरू असून, तेथेच नोंदणीसाठीचे अर्जही उपलब्ध आहेत, तर मग चला, उठा आणि मतदार नोंदणीत सहभागी व्हा. याबाबत जर काही अडचण किंवा प्रश्न असतील तर 8390905716 या किंवा 9011271900(मध्य नाशिक), 9403053036 (पूर्व नाशिक) या क्रमांकावर संपर्क साधावा.