आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतदार नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेचे शेवटचे तीन दिवस उरले असून, मतदारांनी त्वरित आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नुकतेच महापालिकेचे प्रभाग आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गट-गणांची रचना आणि जातनिहाय आरक्षणही जाहीर झाले. त्यामुळे निवडणुकांचे वातावरणनिर्मिती होण्यास काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. शिवाय, या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीही सुरू आहे. परंतु, अजूनही अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांची अपेक्षेप्रमाणे नोंदणी झाली नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता नवीन मतदारांनी जानेवारी २०१७ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांनाही नोंदणी करता येणार आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदविणाऱ्यांची नावे जानेवारीच्या मूळ यादीत समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
निरंतरमोहिमेतही हाेईल नोंदणी :
१४ऑक्टोबरपर्यंत येणारे अर्ज हे विधानसभेच्या मूळ मतदार यादीत समाविष्ट केली जातील. मात्र, त्यानंतरही नोंदणी सुरूच राहणार आहे. शिवाय, नामनिर्देशनपत्र भरण्याच्या अंतिम मुदतीच्या तीन दिवस आधीपर्यंत नाव नोंदविणाऱ्यांची नावेही यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. हीच यादी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे.
पदवीधरसाठी अल्प प्रतिसाद
पदवीधर मतदार नोंदणीसाठी पहिल्या दहा दिवसांतही मतदारांचा प्रतिसाद अल्पच आहे. ऑक्टोबरपर्यंत अवघे साडेपाचशेच्या आसपास असलेली नावे आता १० ऑक्टोबरला हजाराच्या जवळही पोहोचली नाहीत. त्यामुळे मुदत जरी अजून भरपूर असली तरीही मतदारांनी त्वरित नावाची नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...