आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतदार नोंदणीसाठी आज पुन्हा संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागामार्फत शनिवारी व रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद मिळाला
असून, सोमवारी (दि. 30) मतदारांनी त्वरित नावनोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
छायाचित्र मतदारयादी अद्यावत करण्यासाठी 9 जूनपासून शासनाने मतदार पुनरीक्षण मोहीम सुरू केली आहे. शिवाय यादरम्यान येणाºया दोन रविवारी आणि शनिवारी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविली. आयोग आणि प्रशासनाकडून नियमित मतदान केंद्रावरच नावनोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र, तरीही मतदारांमध्ये अपेक्षित उत्साह नसल्याचे नोंदणी मोहिमेच्या पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे.
निवडणूक विभागाचे आवाहन
9 जूनपासून सुरू करण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेचा सोमवारी (दि. 30) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मतदारांनी कमीत कमी शेवटच्या दिवशी तरी आपले नाव यादीत नोंदवावे, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. निरंतर नोंदणीची प्रक्रिया कायम सुरू राहणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.