आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voting 'awareness Campaign Issue At Nashik, Divya Marathi

आर्ट ऑफ लिव्हिंग व दिव्य मराठीचे ‘शंभर टक्के मतदान’ जागृती अभियान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - देशाचा सर्वांगीण विकास आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. तो केवळ आपला हक्क नसून कर्तव्य असल्याचे जाणून प्रत्येकाने ही जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग व ‘दिव्य मराठी’च्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी लोकसभा निवडणुकीच्या मतदानापर्यंत (24 एप्रिल) ‘शंभर टक्के मतदान’ हे अभियान राबविले जाणार आहे.

आपल्या पसंतीचे उमेदवार निवडण्यासाठी, मनातलं सरकार येण्यासाठी शंभर टक्के मतदान होणे आवश्यक आहे. आपल्या कल्पनेतला आदर्श लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान हाच एकमेव पर्याय आहे. विशेष म्हणजे, युवक मतदान प्रक्रियेपासून दूर राहात असल्याने त्यांना या वेळच्या निवडणुकीत सहभागी करून घेण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग व ‘दिव्य मराठी’च्या वतीने नाशिकमधील सर्व महाविद्यालयांत मतदार नोंदणी अभियान राबविले होते. विशेष मतदार मोहिमेतही या दोन्ही संस्थांनी पुढाकार घेतल्याने एकाच दिवसात 75 हजार नवमतदारांची नोंदणी झाली. आता नोंदणीनंतर प्रत्यक्षात मतदान करणेही तितकेच आवश्यक आहे. ‘शंभर टक्के मतदान’ अभियानाअंतर्गत सर्वच स्तरातील नागरिकांमध्ये जागृतीसाठी पथनाट्य, प्रबोधनपर व्याख्याने चौका-चौकात आयोजित केली जाणार आहेत.

आपल्या परिसरातही आयोजित करा उपक्रम
आर्ट ऑफ लिव्हिंग व ‘दिव्य मराठी’च्या या अभियानात तुम्हालाही यात सहभागी होता येईल. आपला चौक, राहता परिसर व कॉलनीत हा उपक्रम दोन्ही संस्थांच्या मदतीने आयोजित करू शकता. त्यासाठी पुढील क्रमांकांवर संपर्क साधा.
सर्व शासकीय कार्यालये : स्मृती (9423963561)
औद्योगिक वसाहती : मुकुंद (9527632194)
रहिवासी भाग : प्रांजळ (9850490238)
शैक्षणिक संस्था : सूश्री (9822044384)
निम्नमध्यमवर्गीय रहिवासी भाग : सिद्धेश (9272799431)