आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री 11 वाजेपर्यंत मतदान चालण्याची शक्यता, 4 मते द्यावी लागणार असल्याने वेळ अपुरा पडेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यंदा महापालिका निवडणुकीत प्रत्येक मतदाराला चार मते द्यायची असल्याने मतदान करण्यासाठी प्रत्येक मतदाराला मोठा वेळ लागणार आहे. सकाळ सायंकाळच्या सत्रात नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्यास मतदानाचा वेळ अपुरा पडण्याची शक्यता खुद्द अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात असून, अनेक मतदान केंद्रावर रात्री ११ वाजेपर्यंत मतदान चालण्याचीही शक्यता आहे. 
 
मतदानाचा टक्का वाढवा यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती मोहीम राबविली जात आहे. यामुळे यंदा महापालिकेच्या निवडणुकीचा मतदानाचा टक्का वाढविण्याचीही शक्यता आहे. शहरात प्रत्येक बूथवर किमान ७०० मतदारांची व्यवस्था आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान करता येईल. तर, प्रत्येक मतदाराला चार मते द्यावी लागणार असल्याने मतदान केंद्रांवर त्याचा वेळ जाणार आहे. मतदान केंद्रावर मतदारांनी पूर्ण करावयाची प्रक्रिया पाहता प्रत्येक मतदाराला मोठा वेळ लागणार आहे. 
 
यामुळे वेळ वाया जाणार 
महापालिकेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असल्याने मतदारांना चार मते देणे बंधनकारक आहे. जोपर्यंत मतदार चार मते देणार नाही तोपर्यंत मत नोंदवले जाणार नाही. मतदाराने कमी मते दिल्यास त्यांना अधिकाऱ्यांकडून माहिती देऊन उर्वरित मते देण्यासाठी सांगितले जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत जास्त वेळ वाया जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...