आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यादीत नाव नसल्याने मतदानाला मुकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मतदान करण्याबाबत सध्या विविध माध्यमांतून चुकीच्या पद्धतीने माहिती पसरविली जात असून, मतदारयादीत नाव असल्याखेरीज कुणालाही मतदान करता येणार नाही. त्यामुळे ओळखपत्र असूनही मतदार यादीत नाव नसल्यास ‘बीएलओं’सोबत वाद न घालता शंका असल्यास थेट जिल्हा निवडणूक विभागाशीच संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विलास पाटील यांनी केले आहे.
पुणे आणि भंडार्‍यामध्ये अनेक मतदारांची नावे मतदारयादीत नसल्याने त्यांनी मोठय़ा प्रमाणावर गोंधळ घातल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही इंदिरानगर, सिडको व इतरत्रही मतदारांची नावेच यादीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून मतदानाच्या दिवशी केंद्रांवर गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेता पाटील यांनी मतदारयादीतून नावे वगळताना संबंधित मतदारांना त्यांच्या पत्त्यावर नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यांची नावेही वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ज्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, अशांचीच आणि कागदपत्रे नसल्यांचीच अर्थात, स्थलांतरित, मृत आणि दुबार असलेल्यांचीच नावे वगळली आहेत. तक्रारदारांनी प्रशासनाशी संपर्क केल्यास त्यांचे निरसन केले जाईल.
मनपा निवडणुकीच्या वेळी यादीत नाव असणार्‍यांची आता नावे नसतील, तर मनपा स्वत:च त्यांची यादी तयार करते. त्यांनी जिल्हा निवडणूक विभागाच्या यादीनुसार नावे तपासणे आणि नोंदविणे आवश्यक आहे. कारण, त्यांनी त्यात ग्रामीण भागातील मतदार नोंदण्याचीही शक्यता असते. आमच्या यादीत तशी शक्यताच नसल्याचे विलास पाटील यांनी सांगितले.गेल्या 9 मार्चला विशेष मोहीम घेऊनही अनेक मतदारांनी त्याची दखल घेतली नसल्यानेच नावे कमी झाल्याचे सर्मथन पाटील विलास पाटील यांनी केले.