आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेसाठी 61.60, जि.प. साठी 69% मतदान; पालिकेच्या मतदानाची टक्केवारी 5 टक्‍के वाढली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी मंगळवारी ६१.६० टक्के मतदान शांततेत पार पडले. राज्य निवडणूक अायाेगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नानाविध उपक्रम राबवल्यानंतर त्यात पाच टक्के वाढ झाली.
 
प्रामुख्याने कुटुंबातील व्यक्तींचे विविध मतदान केंद्रांवर विभाजन झाल्याचा फटका मतदानावर झाला. नाशिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ६९.३० टक्के मतदान झाले. ७३ गट आणि १४६ गण अशा २१९ जागांसाठी उभ्या असलेल्या १०१४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले. जिल्हा परिषदेसाठी गेल्या वेळी ६२.२० टक्के मतदान झाले होते. यावेळी त्यात सात टक्क्याने वाढ झाली. किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. 

दरम्यान, महापालिकेसह जिल्हा परिषदेचीही मतमोजणी गुरुवारी (दि. २३) हाेणार असून, दुपारी १ वाजेपर्यंत महापालिकेतील सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार हे चित्र बऱ्याचअंशी स्पष्ट हाेणार अाहे. महापालिकेसाठी मतदानाला सकाळी साडेसात वाजता शांततेत सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात म्हणजे साडेनऊ वाजेपर्यंत जेमतेम ७ टक्केच मतदान झाले.
 
दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी हळूहळू पुढे सरकत हाेती. यंदा पावणे ११ लाख मतदार महापालिका निवडणुकीसाठी हाेते. त्यात ७० हजार नवमतदारांचा समावेश हाेता. या नवमतदारांमुळे जुन्या मतदान केद्रांवरील नावांमध्ये बराच गाेंधळ उडाला. त्यातून पतीचे नाव एका मतदान केद्रांवर तर पत्नीचे दुसऱ्याच केद्रावर असल्याने धावपळ उडाली. 
 
सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ६१.६० टक्के इतके मतदान झाले हाेते. साडेपाच वाजेपर्यंत मतदार मतदान केंद्रावर दाखल होत होते. त्यामुळे जवळपास १२ मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू हाेते. दरम्यान, गुरुवारी सकाळी वाजता मतमाेजणीला सुरुवात हाेणार असून, एका प्रभागासाठी दीड तास याप्रमाणे प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या अखत्यारीतील सरासरी तीन प्रभाग याप्रमाणे दुपारी वाजेपर्यंत मतमाेजणी पूर्ण हाेईल, त्यामुळष दुपारी वाजता सर्व निकाल जाहीर हाेतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे अाहे. 
 
जि.प. मतदानाचा टक्का दुपारनंतर वाढला 
जिल्हापरिषद पंचायत समितीसाठी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांत अवघे ७.१६ टक्के मतदान झाले. सकाळी ९.३० ते ११.३० दरम्यान १८.३२, दुपारी दीडपर्यंत ३४.३३ तर ३.३० वाजेपर्यंत ४९.५५ टक्के मतदान झाले. मतदारांची रांग दुपारी नंतर वाढण्यास सुरुवात झाली. त्यात महिलांची संख्या अधिक होती. नाशिक शहरालगतच्या गट आणि गणांसाठी मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. कोटमगाव, माडसांगवी येथे मतदारांची संख्या अधिक होती. सायंकाळी ५.३० पूर्वी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर मतदार दाखल झाल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होते. 
 
म्हसरूळसह काही ठिकाणी मतदारांची नावे यादीत नसल्याने गाेंधळ
{ म्हसरूळमध्ये प्रभाग क्रमांक १ मधील दीड हजारावर मतदारांची नावे यादीत नसल्याने रास्ता राेकाेचा प्रयत्न.
{ प्रभाग २८ मध्ये मंडप जाळपाेळ, वाहन ताेडफाेडीमुळे तणाव
{ मतदार यादीतील घाेळामुळे सिडकाेत तीन हजार मतदारांची अडचण
{ दिनकर पाटील-प्रकाश लाेंढे यांच्यात बाचाबाची
{ प्रेम पाटील व दिनकर पाटील 
 
काका-पुतणे अामनेसामने
{ गर्दी पांगवण्यासाठी शिवाजीनगरला साैम्य लाठीमार
{ मृत व्यक्तीच्या नावावर मतदान झाल्याने राधाकृष्णनगरला गाेंधळ
{ अंबडला मतदार वाहतूक करणारा ट्रक ताब्यात
{ सातपूर विभागात मतदारांना पाेलिसांच्या ‘दादा’गिरीचा सामना करावा लागला. ही बाब निदर्शनास अाणून देणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही पाेलिसांच्या राेषाचा सामना करावा लागला. 
{ सातपूरमध्ये मतदारांच्या वाहनांची हवा साेडण्याचे छायाचित्र काढणाऱ्या पत्रकारासच पाेलिस उपनिरीक्षकाने एखाद्या अाराेपीसारखे वाहनात बसवून फिरविले. 
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, जि. प.च्या मतदार याद्यांतही घाेळ, नावे नसल्याने काही मतदानापासून वंचित
 
बातम्या आणखी आहेत...