आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक दृष्टिकोन यशासाठी महत्त्वपूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी परीक्षेचे दडपण किंवा भीती न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षेला सामोरे गेल्यास यश निश्चितच मिळते. प्रवेश परीक्षेचा सराव करताना चौकटबद्ध अभ्यास न करता सामान्य ज्ञानासह क्रमिक पुस्तकांची उजळणी करणे आहे, असा मोलाचा सल्ला प्रा. सुवर्णा बत्तासे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बी. एड. सी. ई. टी. परीक्षेविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रा. उषा क्षत्रिय, प्रा. बत्तासे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्राचार्य भूषण कर्डिले, दीपाली सूर्यवंशी, प्रा. योगिता भामरे, प्रतिमा बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. उषा क्षत्रिय मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, बी. एड. प्रवेश प्रक्रियापरीक्षा ही महत्त्वाची असून, परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाची रचना व परीक्षेचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे.
शिक्षक होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्राबद्दल निष्ठा व आवड असणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या. प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सामान्यज्ञान, मानसिक क्षमता चाचणी आणि शिक्षक अभिक्षमता या तिन्ही विषयांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यातही सामान्यज्ञानासह क्रमिक पुस्तकांची उजळणी केल्यास या परीक्षेत निश्चितच यश मिळते, असा सल्ला प्रा. बत्तासे यांनी विद्यार्थ्यांना दिला.