आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीची प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अकरावीच्या प्रवेश गुणवत्ता यादीत आपले नाव येईल की नाही, याची धाकधूक.. यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची उडणारी तारांबळ आणि एकाचवेळी विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याने उडणारा गोंधळ, या बाबी टाळण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या सहा महाविद्यालयांतील प्रतीक्षा यादी www.missionadmission.com या संकेतस्थळावर टाकण्याचा उपक्रम भाजयुमोने सुरू केला आहे. या संकेतस्थळामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी घरबसल्या बघणे शक्य झाले आहे.
दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांची अकरावीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू होते. शहरातील विशिष्ट महाविद्यालयांकडेच विद्यार्थ्यांचा कल असल्याने संबंधित महाविद्यालयीन व्यवस्थापनाला गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करावी लागते. ही यादी जाहीर होताच ती बघण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठय़ा संख्येने झुंबड उडते.
त्यामुळे नियोजनात विस्कळितपणा येतो. ही बाब ओळखून भाजपचे सरचिटणीस सुरेश पाटील यांच्या पुढाकाराने भाजयुमोच्या वतीने ‘मिशन अँडमिशन’ हे विशेष संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शहरातील केटीएचएम, सिडको कॉलेज, बीवायके-आरवायके, बिटको, के. के. वाघ पंचवटी, व्ही. एन. नाईक या सहा महाविद्यालयांची गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ही यादी संबंधित मोबाइल इंटरनेटमध्ये अथवा संगणकात बघायला मिळते.
वेळ, पैसा आणि श्रमाची बचत
महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियेच्या वेळी विद्यार्थ्यांची होणारी तारांबळ कमी करण्यासाठी आम्ही हे अद्ययावत संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांची वेळ, पैसा आणि र्शम या सर्वच गोष्टींची आता निश्चितच बचत होणार आहे. सुरेश पाटील, शहर सरचिटणीस, भाजप
काय आहे संकेतस्थळात?
भाजयुमोच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमातील संकेतस्थळावर शहरातील कोणत्या महाविद्यालयात किती जागा आहेत, याद्या कधी जाहीर होणार, प्रवेश कधी मिळणार, प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणकोणती याविषयीची सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.