आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षांपासून रखडलेले वाकी धरण पुढील वर्षी होणार पूर्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अपुरा निधी आणि प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे गेल्या 12 वर्षापासून रखडलेले वाकी धरणाचे काम 80 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित 20 टक्के काम जून 2013 पर्यंत पूर्ण होणार असल्याने, पुढील वर्षापासून त्यात साठविलेले पाणी नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु पडलेले सर्वच पाणी उंचसखल भाग असल्याने वाहून जाते. त्यामुळे या पाण्याचा उपयोग करण्यासाठी या तालुक्यात नव्याने दोन धरणे बांधण्यात आली. त्यात घोटीपासून 8 कि.मी. अंतरावर असलेले कर्नोली गाव येथे नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत वाकी नदीवर वाकी धरण बांधण्यात येत आहे. वाकी नदीमार्गे, दारणा नदी त्यातून नांदूरमध्यमेश्वर, विअर येथे त्याची साठवण केली जाईल. त्यानंतर त्या ठिकाणहून कॅनॉल द्वारे मराठवाड्याला पाणी पुरवठा केला जाणार आहे. धरणाचे 80 टक्के काम पूर्ण झाल्याने पूढील वर्षापासून त्यात पाणी साठवण केली जाणार आहे.
या धरणाच्या पाण्याचा उपभोग धरण परिसरातील लोकांसह मराठवाड्यातील दुष्काळी तालुक्यांना होणार आहे. स्थानिकांना पाणी उचलण्यासाठी 7 लिफ्टची सुविधा ठेवण्यात आली असून, त्यातूनच त्यांना पाणी 6 टक्के आरक्षित पाणी वापरता येईल.
साडेपाच हजार क्षेत्र येणार ओलिताखाली :
धरण परीसरातील क्षेत्रासह निश्चित करण्यात आलेल्या मराठवाड्यातील जवळपास 5 हजार 553 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अबलंबून असलेल्या कोरडवाहू शेतजमिनीस फायदा होणार आहे. तसेच स्थानिक शेतकर्‍यांना थेट पंपाद्वारे पाणी उपलब्ध होणार आहे. भूसंपादनापासून ते धरण बांधकाम व इतर सर्व गोष्टींसाठी अंदाजे 163 कोटी 24 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी 93 कोटी खर्च झाले असून, कामांच्या अनुषंगाने उर्वरित निधी मिळणार आहे.