आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंचवटीत भिंत कोसळून वृद्ध ठार; मुलगा गंभ‍ीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पंचवटीतील पाथरवट लेनमध्ये सोमवारी चाळीच्या आवाराची भिंत कोसळून एक वाटसरू वृद्ध ठार, तर एक मुलगा गंभीर जखमी झाला.

पांजरापोळमागील राजवाडा परिसरात करमचंदानी यांची ही चाळ आहे. दुपारी 3 वाजेच्या सुमारास दगडू दिवे (70, रा. मुखेड-वाडी, येवला) व अजय गोविंद मिर्शा (5, रा. वाघाडी, पंचवटी) हे दोघे पायी जात असताना अचानक आवाराची सहा फूट उंचीची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. नागरिकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दिवे यांचा मृत्यू झाला. अजयची प्रकृती चिंताजनक आहे.

जीर्ण झाल्यानेच कोसळली भिंत : भिंतीखाली झाडांची मुळे येऊन शेवाळही झाले होते. त्यातच पावसाच्या पाण्यामुळे ती जीर्ण झाली होती.