आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग समिती सभापती निवडणूक १९ व २० मे राेजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या सहा प्रभाग समितींच्या सभापतिपदासाठी १९ २० मे राेजी यासाठी निवडणूक हाेणार अाहे. दरम्यान, महिला बालकल्याण समिती सभापतिपदासाठी १५ मे राेजी निवडणूक हाेणार असून, ही समिती संख्याबळातील वर्चस्वामुळे भाजपच्या खिशात जमा झाली अाहे. 
 
महापालिका निवडणुकीत १२२ पैकी ६६ जागा मिळवत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. त्या अाधारावर महापाैर, उपमहापाैर, स्थायी समिती सभापती ही तिन्ही महत्त्वाची पदे भाजपने खिशात घातली, मात्र अाता तळापर्यंत जाण्यासाठी महत्त्वाच्या प्रभाग समिती सभापतिपदासाठी त्यांची धडपड सुरू अाहे. सहा प्रभाग सभापतिपदांसाठी १९ २० राेजी निवडणूक हाेत असून, या ठिकाणी पक्षीय बलाबलावर वर्चस्व काेणाचे राहणार हे स्पष्ट हाेणार अाहे. 

भाजपकडेतीन; अन्य विराेधकांकडे जाण्याची शक्यता 
प्रभाग समिती सभापतिपदाचा विचार केल्यास पंचवटी, नाशिकरोड पूर्व विभागात सर्वाधिक नगरसेवक असल्याने तेथे भाजपची एकहाती सत्ता येणार आहे. सातपूर विभागात भाजपकडे बहुमत असले तरी येेथे मनसे रिपाइंची भूमिका महत्त्वाची अाहे. रिपाइं सध्या शिवसेनेसाेबत असून या पार्श्वभूमीवर मनसेची भूमिका महत्त्वाची असेल. मनसे शिवसेनेसाेबत जाण्याची चिन्हे लक्षात घेता येथे भाजपला शरणागती पत्कारावी लागू शकते. पश्‍चिम विभागात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असून, येथे भाजपच्या पाच तर त्याखालाेखाल काँग्रेसच्या जागा अाहेत. याव्यतिरिक्त शिवसेना, राष्ट्रवादी मनसेकडे प्रत्येकी एक जागा असून बारापैकी सात जागांसाठी मॅजिक फिगर करताना सेना, राष्ट्रवादी मनसेची भूमिका महत्त्वाची असेल. सेना अाधीच विराेधी बाकावर गेल्यामुळे येथे ते तटस्थ राहून अप्रत्यक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी मनसे अाघाडीला मदत करू शकतात. सिडकाेत शिवसेनेच्या १४ जागा असून सरळ त्यांचाच सभापती हाेणार अाहे. 

पक्ष पूर्व पश्चिम पंचवटी ना.रोड सिडको सातपूर 
भाजप 12 05 19 12 09 09 
शिवसेना 00 01 01 11 14 08 
काँग्रेस 02 04 00 00 00 00 
रा. काँग्रेस 04 01 00 00 01 00 
मनसे 00 01 02 00 00 00 
अपक्ष 01 00 02 00 00 00 
रिपाइं 00 00 00 00 00 01 
एकूण 19 12 24 23 24 20 

असा अाहे कार्यक्रम 
{१९मे सकाळी १०.३० सातपूर 
{दुपारी १२ वा. सिडकाे 
{दुपारी वा. नाशिकराेड 
{२० मे सकाळी १०.३० वा नाशिक पश्चिम 
{दुपारी १२ वा. पंचवटी 
{दुपारी वा नाशिक पूर्व 
महिला बालकल्याणसाठी 

१५ मे राेजी निवडणूक 
महिला बालकल्याण समिती सभापतिपदासाठी १५ मे राेजी निवडणूक हाेत असून, नऊ सदस्यांपैकी पाच भाजपचे असल्यामुळे त्यांचाच सभापती निश्चित झाला अाहे. दरम्यान, या पदासाठी १२ मे राेजी अर्ज दाखल करण्याची मुदत अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...