आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेकरभरतीसाठी महापाैर बांधणार विराेधकांसह माेट, मुख्यमंत्र्याकडे शिष्टमंडळ नेणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  सहाएेवजी नऊ प्रभाग समित्या शहराची गरज असूनही स्थापनेनंतर मनुष्यबळाची अडचण असल्याचा भडिमार झाल्यानंतर महापाैर रंजना भानसी यांनी विराेधकांसह सत्ताधाऱ्यांची माेट बांधत मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ नेऊन नाेकरभरतीसाठी पाठपुरावा करू, असे अाश्वासन दिले. त्यामुळे अाता महापाैरांची ही कृती भाजपला मानवते का? असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. 
 
पाच टर्म अनुभव असलेल्या भानसी यांची महापाैर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पहिलीच महासभा हाेती. विराेधी पक्षात संख्येने कमी असले, तरी अनुभवी नगरसेवक असल्याने त्यांच्या भात्यातील बाणांना वेगळीच धार हाेती. अपेक्षेप्रमाणे सभा सुरू झाल्यानंतर महापाैरांच्या दिशेने जाेरदार मारा झाला. त्यात प्रामुख्याने अनेक दिवसांपासून मागणी असलेला नाेकरभरतीचा विषय निघाला. विराेधी पक्षांनी अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रश्न निर्माण हाेत असल्याचे लक्षात घेत भरतीसाठी ढाेल बडवणे सुरू केले. विराेधी पक्षनेता अजय बाेरस्ते यांनी केंद्र राज्यात भाजप सरकार असून, राज्यातील भाजप सरकारची परवानगी घेतली तर भरतीचा विषय मार्गी लागेल असे सांगत काेंडीत पकडले. त्यानंतर भानसींनी विराेधी पक्षातील सर्व गटनेत्यांना एकत्रित करून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे उत्तर दिले. सभेच्या प्रारंभी मुकणे याेजनेसाठी केंद्राकडे पाठपुरावा करून निधी अाणल्याबद्दल खासदार गाेडसे यांच्या अभिनंदनाचा ठराव केला. 

दिनकर पाटलांचा घरचा अाहेर 
सत्तेतअसले तरी प्रश्न मांडण्याचा विराेध करण्याचा गुणधर्म कायम असल्याचे दिनकर पाटील यांनी दाखवून दिले. प्रभाग समित्या वाढवाव्या की नाही या विषयावर चर्चा सुरू असताना दिनकर पाटील यांनी विभागीय अधिकाऱ्यांचे अधिकार काय, याची माहिती वदवून घेणे सुरू केले. त्यावर महापाैरांनी विषयांतर करू नका असे सांगितल्यावर पाटील यांनी त्यांच्यावर हल्लाबाेल केला. महापाैरांकडून बाेलू दिले जात नाही, अशी तक्रार सुरू केल्यावर विराेधी पक्षाने अागीत तेल अाेतण्याचा प्रयत्न केला. ते बघून महापाैरांनी माघार घेत, बाेला बाेला असे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू करीत विषयांतर केल्यावर पुन्हा महापाैरांना हस्तक्षेप करावा लागला. त्यातून त्यांचे पाटील यांचे खटके उडाले. 

..तर विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई 
विभागीयअधिकाऱ्यासह पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक देणे, त्यांची कामे धुडकावण्याचे प्रकार हाेत असल्याची कैफियत नगरसेवकांनी मांडली. त्यावर महापाैर भानसी यांनी विभागीय अधिकाऱ्यांनी नगरसेवकांची कामे प्राधान्याने मार्गी लावावी विभागीय अधिकारी एेकत नसतील तर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी तंबी दिली. 

भाजपनगरसेवकाने पळवले पाणी 
सभेतनवनिर्वाचित नगरसेवक किरण गामणे-दराडे यांनी प्रभाग २७ मधील पाणी भाजप नगरसेवक पळवत असल्याचा गाैप्यस्फाेट केला. त्यावर भाजप नगरसेवकांनी अाक्षेप घेत पक्षाची अशा पद्धतीने बदनामी याेग्य नसल्याचे उत्तर दिले. महापाैरांनी त्याची गंभीर दखल घेत भाजपकडून पाणी पळवले जात असल्याचा उल्लेख सभा पटलावरून काढून टाकला. दराडे यांना तंबी देत अशा पद्धतीने महासभेतील वर्तन यापुढे खपवून घेतले जाणार नाही. नवीन असल्याने सवलत देत असल्याचे सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...