आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारूप प्रभागरचनेत लहान-माेठे वाॅर्ड, लाेकसंख्येच्या घनतेचा विचार; ३१ प्रभागांची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेचा अाराखडा बुधवारी (दि. ७) विभागीय महसूल अायुक्तांना सादर करण्यात अाला. त्यातील प्रभाग लाेकसंख्येनुसार असल्याने गावठाण भागातील लाेकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागात लहान, तर नवविकसित वसाहतींचे वाॅर्ड माेठे हाेण्याची चिन्हे अाहेत.
महापालिका प्रभागरचनेतील प्रारूप अाराखड्यात लाेकसंख्येच्या घनतेनुसार हे वाॅर्ड बनवण्यात अाले अाहेत. प्रत्येक प्रभागामध्ये सुमारे ४३ ते ४५ हजार मतदार असतील. त्या हिशेबाने १४ लाख ८४ हजार लाेकसंख्येच्या हिशेबाने सुमारे ३१ प्रभाग करण्याचा हा प्रस्ताव अाहे. विभागीय अायुक्तांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती या प्रस्तावाचा अभ्यास करून शनिवारपर्यंत राज्य निवडणूक अायाेगाकडे मान्यतेसाठी पाठवेल.

राज्य निवडणूक अायाेगाने महापालिका निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली असून, सप्टेंबरपर्यंत प्रारूप प्रभागरचना करून विभागीय अायुक्तांकडे पाठवण्याचे बंधन घातले हाेते. त्यानुसार महापालिकेने समिती स्थापन करून प्रभागरचनेचे काम पूर्ण केल्याचे समजते. त्यात २,७०० प्रगणक गट मिळून प्रभागरचना केल्याचे सांगितले जाते. एका प्रभागात ९० प्रगणक गट अंतर्भूत हाेते. सर्व बाबींचा साकल्याने विचार करून ३१ प्रभाग हाेण्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे.

निवडणूक अायाेगाकडे अाराखडा पाठवणार
विभागीय महसूल अायुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीकडून या प्रस्तावित प्रारूप अाराखड्याबाबत अभ्यास केला जाणार अाहे. त्यातील सर्व त्रुटी दूर करण्यात येऊन शनिवारपर्यंत हा प्रस्ताव राज्य निवडणूक अायाेगाकडे पाठविण्यात येणार अाहे.

प्रभागाच्या प्रारूप अाराखड्याच्या निश्चितीनुसार अनेक इच्छुक त्यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय घेणार अाहेत. त्यामुळे या अाराखड्याकडे महानगरातील प्रत्येक इच्छुकाचे लक्ष लागलेले हाेते. अाराखड्याची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू हाेते. त्यामुळेच प्रारूप प्रभागरचनेचे कामकाज अत्यंत गाेपनीय ठेवण्यात अाले हाेते. मंगळवारी सायंकाळी अायुक्तांनी कार्यालय साेडताना शेजारील दालनही सील करून ठेवण्याची दक्षता घेतल्याची चर्चा हाेती.
बातम्या आणखी आहेत...