आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन भाजीबाजारात वारकर्‍याचा खून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नवीन भाजीबाजारात झोपण्याच्या वादातून एका वारकर्‍यास दोन जणांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. दोन संशयितांना पंचवटी पोलिसांनी काही तासांत अटक केली.

गणेशवाडीतील भाजीबाजारात एका वारकर्‍याचा मृतदेह असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना नागरिकांनी दिली. मारहाणीत मृताच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मरीमाता झोपडपट्टीमधून अक्षय राजू मोरे, विनोद सुरेश जाधव या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांनी खून केल्याची कबुली दिली. पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयितांना अटक केली.