आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वनी-हवा प्रदूषणामध्ये वाढ; शुद्ध पाण्याचे प्रमाणही कमीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कधीकाळी स्वच्छ हवा, शांतता अाणि गाेदावरीच्या निर्मळ पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकची स्थिती हवा, ध्वनी अाणि पाणी प्रदूषणाच्या बाबतीत बिघडत चालल्याचे चित्र अाहे. शहरातील प्रदूषणाचा वार्षिक अहवाल पर्यावरण विभागाने जाहीर केला असून त्यात, ध्वनी प्रदूषण वाढल्याचा निष्कष काढण्यात अाला अाहे. शुद्ध हवेचा विचार करता महापालिका मुख्यालय (राजीव गांधी भवन) येथेच सर्वसाधारण दर्जा असून शुद्ध पाण्याचे प्रमाणही गतवर्षीच्या तुलनेत कमीच अाहे. 
 
महापालिकेचा अाराेग्य पर्यावरण विभाग दरवर्षी पर्यावरण मापन अहवाल तयार करते. २०१६ च्या पर्यावरण अहवालाला गुरुवारी (दि. २१) महासभेत मान्यता देण्यात अाली. या अहवालाचा विचार करता यंदा हवा प्रदूषणात चारपैकी दाेन ठिकाणी चांगला, तर दाेन ठिकाणी सर्वसाधारण दर्जा देण्यात अाला अाहे. विशेष म्हणजे, महापालिका मुख्यालयाजवळच हवा गुणवत्ता निर्दशांक ४५.० असून हे प्रमाण सर्वसाधारण दर्जात माेडते. व्हीअायपी कंपनीजवळ ४५.५० असा निर्देशांक असून येथेही हवा सर्वसाधारण गुणवत्तेची अाहे. गाेल्फ क्लबजवळील अारटीअाे काॅलनी येथे ४०.५०, तर उद्याेग भवनाजवळ ३६.९२ असा हवा गुणवत्ता निर्देशांक अाहे. या दाेन्ही ठिकाणचा हवा गुणवत्ता निर्देशांक चांगल्या प्रकारात माेडताे. सल्फरडाय अाॅक्साईड, नायट्रस अाॅक्साईड तसेच एसपीएमचा अंतर्भाव करून हवा प्रदूषण ठरवले जाते. 
 
४५ महापालिकामुख्यालयाजवळ हवा गुणवत्ता निर्देशांक सर्वसाधारण 
४५.५०व्हीअायपीकंपनीजवळ 
४०.५०गाेल्फक्लबजवळील अारटीअाे काॅलनी येथे. 
३६.९२उद्याेगभवनाजवळ 
 
असे अाहेत उपाय 
{हवा : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाबराेबर समन्वय साधून शहरातील कारखाने परिसरात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्र बसवणे. स्क्रबर्स प्रेसिपीटरचा त्यात अंतर्भाव. ऋतुमानानुसार हवामानावर देखरेख. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्ययावत करणे, पीयूसी प्रमाणपत्र घेणे सक्तीचे करावे, वृक्षाराेपण करणे सिग्नलवर प्रदूषण कमी करणारी यंत्रणा बसवणे. 
{ ध्वनी : धार्मिक उत्सव लग्न यामध्ये डीजे इतर वाद्य वाजवणे बंद करणे वा कमी अावाजात परवानगी देणे, शांतता क्षेत्र निर्माण करणे, गाडीचे हाॅर्न ट्रॅफिक जंक्शनवर वाजवणे बंद करणे, स्वयंसेवी संस्था, विविध प्रसारमाध्यमांद्वारे लाेकशिक्षण देणे 
{पाणी : प्रक्रिया केलेले सांडपाणी नदीपात्रात मिसळू देणे, कारखान्यांमधून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाण्यावर जागेवर प्रक्रिया करणे, जलशुद्धीकरण प्रक्रियेत तुरटी क्लाेरिनचा वापर करणे, तुरटी मात्रा वाढवून गढूळपणा कमी करणे, नदीपात्रात अांघाेळ करणे कपडे धुणे थांबवणे, गणेश विसर्जन अन्य निर्माल्य नदीपात्रात टाकणे. 
 
निवासी बाजारपेठेतही अावाजाचा दणदणाट 
महापालिकाक्षेत्रात निवासी बाजारपेठ क्षेत्रात अावाजाचा दणदणाट असल्याचे चित्र अाहे. निवासी क्षेत्रात २०१६ मध्ये ५५ डेसिबल अावाज असणे बंधनकारक असताना दिवसा ८७ डेसिबलपर्यंत, तर रात्री ७० डेसिबलपर्यंत प्रमाण गेले अाहे. बाजारपेठ भागात दिवसा ५५ डेसिबल अावाज बंधनकारक असताना दिवसा ७७ तर रात्री ६९ डेसिबलपर्यंत प्रमाण अाहे. 
 
पाणी नमुन्यांचे प्रमाण घटले अन‌् शुद्धताही 
गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी शुद्धतेची टक्केवारी घटल्याचे चित्र अाहे. २०१५ मध्ये १७ हजार ८८२ पाणी नमुने तपासले त्यात १७ हजार ५१३ पाणी नमुने पिण्यायाेग्य हाेते. टक्केवारीचे प्रमाण ९७.९४ इतके हाेते. २०१६ मध्ये १० हजार १५८ पाणी नमुने तपासले त्यात ९९८७ इतके पाणी नमुने पिण्यायाेग्य हाेते. टक्केवारीचे प्रमाण ९७.३१ इतके अाले अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी शुद्धतेची टक्केवारी तर घटलीच, शिवाय तपासणीसाठी पाणी नमुने घेण्याचे प्रमाणही घटले अाहे.