आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Controversy Between Marathwada And North Maharashtra

पाण्यासाठी पेटले \'युध्द\', नाशकात धरणावरील विजेच्या ताराही तोडल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्य सरकार व उच्च न्यायालयाच्या अादेशानुसार साेमवारी पुन्हा प्रचंड पाेलिस बंदाेबस्तात नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा या दाेन धरणांतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी साेडण्यात अाले. दरम्यान, गंगापूर धरणाची पातळी खालावत असल्याने अाता कश्यपी धरणातून गंगापूरसाठी पाणी साेडण्याचे प्रशासनाचे नियोजन हाेते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यालाही प्रचंड विराेध केला अाहे. या धरणातूनही पाणी साेडता येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी धरणावर वीजपुरवठा करणाऱ्या तारा ताेडून टाकल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला अाहे. नाशिकमधील गंगापूर धरणाची पातळी बघता प्रशासनाने दाेन दिवसांपूर्वीच गाैतमी धरणातून ११० क्युसेस पाणी जल विद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून साेडले अाहे. या धरणातील साठाही मर्यादितच असल्याने अाता कश्यपीचे पाणी गंगापूर धरणात साेडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र, कश्यपीसाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून अद्यापही माेबदला मिळालेला नसल्याने येथील शेतकरी प्रचंड संतप्त झाले अाहेत. पाण्याचा विसर्ग करता येऊ नये यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी विद्युत ताराच उखडून टाकल्या अाहेत.

४० टक्के पाण्याचा अपव्ययच
नाशिक व नगरच्या धरणांमधून साेडण्यात अालेले पाणी पाचव्या दिवशी जायकवाडीत पाेहाेचेल. दारणा व गंगापूरचे पाणी गाेदावरीमार्गे निफाड येथील नांदूर- मधमेश्वर धरणात व तेथून राहुरी मार्गे जायकवाडीकडे जाईल. गंगापूर धरणातील पाणी रामकुंडापर्यंत येण्यासाठी सहा तास लागतात. तर २४ तासांत नांदूर- मधमेश्वर व तिसऱ्या दिवसापासून नगर मार्गे जायकवाडीकडे त्याचा प्रवास हाेणार अाहे. पाण्याची चाेरी राेखण्यासाठी प्रशासनाने खबरदारी म्हणून नदीकडेलगतचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला अाहे. असे असले तरी धरणांमधून साेडलेल्या पाणीसाठ्यापैकी फक्त ६० टक्केच पाण्याचा लाभ पुढील धरणाला हाेणार असून उर्वरित पाण्याचे विविध कारणास्तव नुकसान हाेणार असल्याचे तहसीलदार गणेश राठाेड यांनी सांगितले.

सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया

...मग जबाबदारी प्रशासनाची
जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीप्रमाणे पाणी बंद करण्यासाठी साेमवारी रात्रीपर्यंतचा वेळ िदला अाहे. मंगळवारी पाणी बंद न झाल्यास िजल्ह्यात अांदाेलन केले जाईल. अांदाेलन लाेकशाही पद्धतीने हाेईल, मात्र काही समाजकंटकांनी त्याचा फायदा घेऊन धुडगूस घातला तर त्यास िजल्हाधिकारी वा जिल्हा प्रशासनाचच जबाबदार असेल.
अनिल कदम, अामदार, शिवसेना

हा कुठला न्याय?
पालकमंत्री अाणि मुख्यमंत्र्यांशी अधिकारी चर्चा करत अाहेत. अधिकारी वर्गही पाणी साेडू नये यासाठी प्रयत्नशील अाहे. परंतु तरीही शासनाने एेकले नाही तर नाइलाजास्तव नाशिक बंद करावे लागेल. अामच्याा पाण्यातून मराठवाड्यातील बिअरच्या फॅक्टऱ्या चालवायच्या हा कुठला न्याय?
शरद अाहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

विलासराव घ्यायचे फाेन
मुख्यमंत्र्यांना वारंवार फाेन करून संपर्क हाेत नव्हता. त्यांचे पीएही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या अामदार जयवंत जाधव यांनी पीएला फैलावर घेतले. ‘विलासराव मुख्यमंत्री असताना साध्या रिक्षाचालकाचा फाेन घ्यायचे, परिस्थिती बघून किमान लाेकप्रतिनिधींचा फाेन घेण्याविषयी मुख्यमंत्र्यांना कळवा’, असे त्यांना सुनावले.

पाणी परत कसे अाणणार ?
सर्वाेच्च न्यायालयात अपिलासाठी खासदार हेमंत गाेडसे हे दिल्लीत गेले अाहेत. अजून उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अपिलासाठी एक िदवसाचा अवधी बाकी अाहे. अशा परिस्थितीत सर्वाच्च न्यायालयाने स्थगिती दिली तर साेडलेले पाणी पुन्हा कसे गंगापूर धरणात अाणणार? असा सवाल अांदाेलकांनी केला.
मुख्यमंत्र्यांचा धिक्कार, अाज घंटानाद करणार
‘सर्वाेच्च न्यायालयाचा दाेन दिवसांत काय ताे निवाडा येऊ द्या, न्यायालयाने म्हटले पाणी साेडा तर काेणीही हरकत घेणार नाही, मात्र न्यायालयाचे न एेकता सत्तेचा वापर करून नाशिककरांच्या ताेंडचे पाणी पळवू नका?’ अशी विनवणी करीत नाशिकमधील सर्वपक्षीय नेत्यांनी साेमवारी तब्बल तीन तास जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांना घेराव घालत गंगापुर धरणातील पाणी थांबवण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र अापल्याकडे तसे अधिकार नसल्याचे सांगितले.
दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील सर्व भाजप अामदारांच्या घरासमाेर घंटानाद करून बुधवारी नाशकात माेर्चा काढण्याचा इशारा देण्यात अाला.

गंगापूर धरणातून रविवारी मध्यरात्री थांबवलेले पाणी साेमवारी दुपारी पुन्हा साेडण्यात अाले. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग अाला. अामदार अनिल कदम, जयवंत जाधव, महापाैर अशाेक मुर्तडक यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढला. त्यानंतर कुशवाह यांच्या दालनात ठिय्या मांडत साडे तीन तास पाणी थांबवण्यासाठी युक्तिवाद केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी अापल्या अखत्यारीत निर्णय नसल्याचे सांगितले. त्यावर कदम व जाधव यांनी अापत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना सर्व निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचे परिपत्रकही वाचून दाखवले. मात्र, त्यावरही जिल्हाधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त केली.
पालकमंत्र्यांनी झटकले हात
‘रविवारी रात्री अांदाेलनासाठी माेजकेच लाेक हाेते. अाज या प्रश्नाची व्याप्ती सर्वांना माहिती असल्यामुळे पाणी सुरूच ठेवले तर भयावह उद्रेक हाेईल,’ अशी भीती महापाैर अशाेक मुर्तडक यांनी व्यक्त केली. त्यावर िजल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून पाणी साेडण्यासाठी जमलेले अांदाेलक व अन्य माहिती दिली. त्यावर महाजन यांनी अाता मुख्यमंत्रीच काय ताे निर्णय घेऊ शकतात, असे सांगून हात वर केले. त्यामुळे पालकमंत्र्यांचा धिक्कार करीत जाेरदार घाेषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर कुशवाह यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. राजशिष्टाचाराप्रमाणे थेट मुख्यमंत्र्यांना फाेन करता येणार नाही, अशी अडचण त्यांनी सांगितली. त्यानंतर जाधव व कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांशी संपर्क साधला असता त्यांनी बैठकीत व्यग्र असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविराेधातही घाेषणाबाजी सुरू झाली.
कायदा हाती घेऊ नका
नाशिकमधील परिस्थितीबाबत विस्तृत अहवाल जलसंपदामंत्री, मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल. त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय हाेईल. थाेडा अवधी द्या. कायदा व सुव्यवस्था हातात घेऊन काही उपयाेग नाही.
दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी