आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याेगांची पाणीकपात २० टक्क्यांवर नेणार, पालकमंत्र्यांना उद्याेजक घालणार साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - संभाव्य पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता सातपूर अाणि अंबड अाैद्याेगिक वसाहतींकरिता दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला गेला अाहे. याबाबत अाठ दिवसांपूर्वीच ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले हाेते. मात्र, तेव्हा एमअायडीसीला पाणी कपातीबाबत पत्र मिळालेले नव्हते, ते साेमवारी प्राप्त झाले अाहे. या पाणीकपातीमुळे उद्याेगांवर विशेष परिणाम हाेणार नसल्याने नाराजी नसल्याचे चित्र असून, दुसरीकडे मात्र मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने २० टक्के पाणी कपात करण्याचा घाट जलसंपदाकडून घातला जात असल्याचे खात्रीशीर वृत्त अाहे.

सातपूर अाणि अंबड अाैद्याेगिक वसाहतीत पाच हजारांच्या अासपास लघु, मध्यम माेठे उद्याेग अाहेत. यात पाण्याची माेठ्या प्रमाणावर गरज असलेले जवळपास सातशेच्या अासपास अन्नप्रक्रिया, रसायने अाणि अाैषध निर्मिती उद्याेग अाहेत. पावडर काेटिंग अाणि प्लेटिंग उद्याेगांची संख्या एक हजारांच्या अासपास म्हणजे सर्वाधिक अाहे. बहुतांश उद्याेगांत केवळ पिण्यासाठी अाणि दैनंदिन वापरासाठी पाण्याची मागणी असते. त्यातच एमअायडीसीने केलेल्या पाण्याच्या अारक्षणाच्या तुलनेत उचल कमी असून, दहा टक्के पाणी कपात करूनही नियमित गरज पूर्ण हाेऊ शकत असल्याने या पाणीकपातीचा विराेध उद्याेजकांनी केला नाही. दुसरीकडे मात्र २० टक्के पाणी कपातीकरिता जलसंपदा विभागाकडून एमअायडीसीला सहमत केले जाण्यासाठी जाेर दिला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. मार्च महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची स्थिती पाहून हा निर्णय घेतला जाऊ शकताे, असेही सूत्रांनी सांगितले. सिन्नर अाैद्याेगिक वसाहतीसह विंचूर वाइन पार्कच्या पाणी कपातीचा निर्णय तूर्तास टाळण्यात अालेला अाहे. मात्र, वेळप्रसंगी येथेही पाणीकपातीचा निर्णय घेतला जाऊ शकताे.

उद्याेग-पालकमंत्र्यांकडे मांडणार व्यथा : दरम्यान,ह्या संभाव्य पाणी कपातीबाबतची नाराजी कपात करण्याची मागणी उद्याेजक येत्या जानेवारी राेजी नाशिक दाैऱ्यावर असलेल्या उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे करण्याची शक्यता अाहे. याचबराेबर जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही याबाबत अशीच मागणी केली जाणार अाहे.

एमअायडीसीने गळती थांबवावी...
दहाटक्केपाणी कपात अाम्ही सहज मान्य केली त्यातही एमअायडीसीने सध्या हाेत असलेली दहा टक्के गळती थांबविणे गरजेचे असल्याचे अावाहन अाम्ही केले हाेते. २० टक्के पाणी कपातीला मात्र अामचा विराेध अाहे. विवेक पाटील, अध्यक्ष,अायमा

२० टक्के पाणीकपात अाम्हाला मान्य नाही
मराठवाड्याकरिताजेपाणी साेडले गेले, त्यामुळे नाशिककरांना पाणीटंचाईला सामाेरे जावे लागणार अाहे. २० टक्के पाणी कपात अाम्हाला मान्य नाही. उद्याेगमंत्री अाणि पालकमंत्र्यांना याबाबत अाम्ही विनंती करणार अाहाेत. संजीव नारंग, अध्यक्ष,निमा