आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी गळतीला प्रशासनच जबाबदार; मामा ठाकरेंचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक (सिडको)- शहरात पाणीपुरवठय़ासंदर्भात प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. आठवड्यातून एक दिवस पाणी कपात सुरू आहे. मात्र काही ठिकाणी प्रशासनाच्या बेजबादारपणामुळे विविध प्रकारे पाणी गळती सुरू आहे. या गळतीला महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप माजी स्थायी सभापती मामा ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी केला.

सिडको, इंदिरानगर तसेच शहरातील विविध भागात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येणे, काही ठिकाणी पाणीच न येणे. तर याउलट अनेक ठिकाणी वॉल लिकेज होणे, पाईप लिकेज होणे असे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकारामुळे प्रशासनाच्या कामाचा ढिसाळपणा व बेजाबदार पध्दतीचे नियोजन या गोष्टी कारणीभूत आहेत. शहरातील अशाप्रकारच्या पाणीगळती संदर्भात आपण आवाज उठविणार असल्याचे मामा ठाकरे यांनी सांगितले.

शहरातील सर्वात महत्वाच्या स्वा. सावरकर तरण तलावासाठीच्या बॅलन्सींग टाकीला गळती लागली असून यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते आहे. सकाळी भरलेली टाकी काही वेळातच खाली होत असून महापालिका प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी ठाकरे केली आहे.

पालिका प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव
शहरात सर्वच ठिकाणी पाणी गळतीला प्रशासन जबाबदार असून, नियोजनाचा अभाव आहे. राज्यात दुष्काळाची भयावह स्थिती असताना आपल्याकडे पुरेसे पाणी असूनही प्रशासन काळजी घेत नाही.
-मामा ठाकरे, माजी स्थायी समिती सभापती.

शहरातील सर्वच ठिकाणची गळती थांबवा
केवळ सावरकर तलावातच नाही तर अनेक ठिकाणी विविध पध्दतीने पाणी गळती सुरू आहे. या सर्वच ठिकाणी प्रशासनाने लक्ष देऊन पाणी गळती रोखावी ही विनंती.
- विजय जाधव, नागरिक