आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात पाण्यासाठी महिलांचा रुद्रावतार; दुजाभावाचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वर्षभरापासून कमी दाबाने पाणी, त्यातच मंगळवारी पाणीपुरवठा बंद आणि बुधवारी-गुरुवारी कमी दाबाने पुरवठय़ाच्या पार्श्वभूमीवर हाल होणार्‍या महिलांनी बुधवारी रुद्रावतार धारण करत रास्ता रोकोचे पाऊल उचलले. उच्च मध्यमवर्गीयांची वसाहत असलेल्या अशोका मार्गावरील सिद्धिविनायक पार्कमधील या महिला आक्रमक होताच महापालिका अधिकार्‍यांनी त्वरित टँकर पाठवले.

कमी दाबामुळे चौथ्या मजल्यावर पाणीच चढत नसल्याने नोकरदार महिला आणि विद्यार्थ्यांची जास्त अडचण होत आहे. परीक्षा सुरू असलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही तळमजल्यावरून पाणी आणावे लागते. लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे काही भागात मुबलक पाणी, तर काही भागात टंचाई असल्याचा आरोप महिलांनी केला. नगरसेविका नीलिमा आमले यांना त्यांनी घेराव घातला. श्याम पगारे, तारा रोहिकर, बीना सिंग, वीणा गुप्ता, स्वाती कुलकर्णी, मीना निकाळे, तृप्ती कुलकर्णी, रोमा आहुजा, जान्हवी चौधरी यांच्यासह 120 फ्लॅट्समधील महिलांनी हे आंदोलन केले. उपमहापौर सतीश कुलकर्णी उशिरा आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

तिथे रस्त्याला पाणी, आम्हाला प्यायला नाही..
डीजीपीनगर (क्र. 1) मधील काही रस्त्यांवर पालिकेतर्फे पाणी मारले जाते. मात्र, वारंवार विनंती-तक्रार करूनही आम्हाला पिण्यापुरतेही देत नाहीत. टंचाईच्या ठिकाणी टॅँकर पाठवला जातो; पण आम्हाला साधा एक टँकर देत नाहीत. मुद्दाम भेदभाव केला जात आहे, असे या महिलांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

यांना जाऊ देऊ नका..
‘पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत महापालिका अधिकार्‍यांना जाऊ देऊ नका,’ असे काही महिला म्हणत होत्या. तेव्हा एक महिला पुढे येऊन म्हणाली, की रस्त्यावरून इमारतीच्या आवारात आणणार्‍या पोलिसांनाही जाऊ देऊ नका, म्हणजे बरोबर चौथ्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचेल.

अन्यथा पोलिसांच्या घरी..
‘रास्ता रोको’मुळे अशोका मार्गावर वाहतूक खोळंबल्याने वरिष्ठ पोलिस अधिकारी तेथे पोहोचले. महापालिकेचे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता यू. एम. धर्माधिकारी व अभियंता व्ही. बी. गाजुलही काही वेळाने दाखल झाले. तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, संतप्त महिला लेखी आश्वासनाच्या मागणीवर ठाम होत्या. त्याला अभियंत्यांनी नकार दिल्याने तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर पोलिसांच्या घरी जेवायला येऊ, असे त्या म्हणताच ‘अहो, आम्ही मध्यस्थी करण्यासाठी आलो आहोत. हे काम पालिकेचे आहे,’ असे सांगून पोलिस अधिकारी बाजूला झाले.

अहो, आमदारांनाही आश्वासन दिले..
पाणीप्रश्नी आमदार वसंत गिते यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. पालिका अधिकार्‍यांनी त्यांनाही ‘लगेच पाणीपुरवठा सुरळीत करतो’ असे आश्वासन दिले आहे. मात्र, ते अजून पूर्ण झालेले नाही, अशी कैफियत महिलांनी मांडली.

तातडीने केला पुरवठा
नवीन 20 इंची जलवाहिनी टाकली असून, गांधीनगरला व्हॉल्व्ह टाकण्याचे काम बाकी आहे. सध्याची 16 इंची जलवाहिनी तीन-चार भागांसाठी विभागली गेल्याने काही ठिकाणी कमी दाबाने पुरवठा होतो. तसेच, मंगळवारी पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने पुढील दोन-तीन दिवस पुरेसे पाणीच येत नाही. सिद्धिविनायक पार्क, गुरुदत्त आणि र्शी गुरुदत्त सोसायटीत गेल्या तीन दिवसांपासून पुरवठा झाला नाही हे खरे आहे. लगेचच सहा टँकर पुरवठा केला. मंगळवारी पुरवठा बंद ठेवण्याऐवजी दररोज केवळ एक वेळ पाणी द्यावे, अशी माझी मागणी आहे. दोन दिवसांपूर्वीच अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांना एकवेळ पाणीपुरवठय़ाबाबत सूचना केली आहे.
-सतीश कुलकर्णी, उपमहापौर

10-15 मिनिटेच पाणी..
वर्षभरापासून एकदाच पाणी येते. महापालिका अधिकार्‍यांना वारंवार सांगितले. आता तर फक्त दहा-पंधरा मिनिटेच पाणी येते.
-स्वाती कुलकर्णी

शेजारी मिळते पाणी..
आम्ही चौथ्या मजल्यावर राहतो. शेजारच्या फ्लॅटमध्ये पाणी येते. मात्र, आम्हाला पाणी मिळत नाही. हे असे का होते? हे दुर्लक्षामुळे आणि मनमानी कारभारामुळे होत आहे.
-मीना निकाळे

डबा बनवणेही मुश्कील.
वापरायचे पाणी सोडाच; पण प्यायलासुद्धा पाणी नाही. त्यामुळे मुलांसाठी जेवणाचा डबा बनवणेही मुश्कील झाले आहे. पाण्यासाठी इकडे-तिकडे जावे लागते.
-जान्हवी चौधरी

रडूच कोसळते..
नोकरदार महिलांना वेळेचे नियोजन करून काम करावे लागते. मात्र, कमी दाबाने पाणी येत असल्याने मोलकरीण महिलाही येत नाहीत. नोकरी आणि पाण्याची अडचण सांभाळताना अक्षरश: रडू येते. तृप्ती कुलकर्णी

ताणामुळे विभाजन
तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल. एकाच पाइपलाइनवर बराच ताण येत असल्याने पाणी विभागून देण्यात येते.
-व्ही. बी. गाजुल, अभियंता, गांधीनगर पाणीपुरवठा विभाग

परीक्षेच्या काळात..
"पाणी येत नसल्याने रोजच कुठे पाणी मिळेल यासाठी झगडावे लागते. आमची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. बर्‍याच दिवसांपासून पाणी नसल्याने अभ्यासावर परिणाम होत आहे."
-संजना फड, तन्मयी चौधरी

शहरात उभारणार 78 उंच जलकुंभ
नाशिक । सध्या शहरात 40 मीटर उंचीपर्यंतच्या गृहप्रकल्पांना परवानगी देण्यात आल्याने भविष्यात तेथे सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पालिकेने 78 उंच जलकुंभ उभारण्याचे काम हाती घेतले असून, त्यातील 12 प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत.

मंगळवारचा पुरवठा बंद असल्याने त्यापुढील दोन-तीन दिवस सिडको, सातपूर, उपनगर, वडाळागाव यासह अनेक ठिकाणी कमी दाबाने पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सिद्धिविनायक पार्कमधील फ्लॅटधारकांना त्यामुळेच पुरवठा झाला नाही.

उंच इमारतींमध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दाही या निमित्ताने समोर आला. सध्या बहुतांश ठिकाणी 24 मीटरपर्यंत उंचीच्या इमारती असून, भविष्यात अनेक गृहप्रकल्प 40 मीटरपर्यंतच्या उंचीचे उभे राहणार आहेत. काही प्रकल्पांची कामेदेखील सुरू आहेत. त्यानुसार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नियोजन सुरू केले आहे. अशा इमारतींसाठी 78 ठिकाणी 15 ते 20 मीटर उंचीचे जलकुंभ उभारण्याची कामे हाती घेण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यू. एम. धर्माधिकारी (वितरण) यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

20 लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ
सिंहस्थ कुंभमेळ्यासह उंच इमारतींना पाण्याचे योग्य वितरण होण्यासाठी 20 लाख लिटर क्षमतेचे 78 प्रकल्प सुरू आहेत. सध्याच्या जलकुंभांची उंची 15 मीटरच्या आत आहे.

दुजाभावाचा आरोप । अशोकारोड परिसरात महिलांचा रास्ता रोको; पालिका अधिकार्‍यांनी केली तातडीने व्यवस्था
पाण्यासाठी महिलांचा रुद्रावतार

प्रतिनिधी । नाशिक

वर्षभरापासून कमी दाबाने पाणी, त्यातच मंगळवारी पाणीपुरवठा बंद आणि बुधवारी-गुरुवारी कमी दाबाने पुरवठय़ाच्या पार्श्वभूमीवर हाल होणार्‍या महिलांनी बुधवारी रुद्रावतार धारण करत रास्ता रोकोचे पाऊल उचलले. उच्च मध्यमवर्गीयांची वसाहत असलेल्या अशोका मार्गावरील सिद्धिविनायक पार्कमधील या महिला आक्रमक होताच महापालिका अधिकार्‍यांनी त्वरित टँकर पाठवले.

कमी दाबामुळे चौथ्या मजल्यावर पाणीच चढत नसल्याने नोकरदार महिला आणि विद्यार्थ्यांची जास्त अडचण होत आहे. परीक्षा सुरू असलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही तळमजल्यावरून पाणी आणावे लागते. लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे काही भागात मुबलक पाणी, तर काही भागात टंचाई असल्याचा आरोप महिलांनी केला. नगरसेविका नीलिमा आमले यांना त्यांनी घेराव घातला. श्याम पगारे, तारा रोहिकर, बीना सिंग, वीणा गुप्ता, स्वाती कुलकर्णी, मीना निकाळे, तृप्ती कुलकर्णी, रोमा आहुजा, जान्हवी चौधरी यांच्यासह 120 फ्लॅट्समधील महिलांनी हे आंदोलन केले. उपमहापौर सतीश कुलकर्णी उशिरा आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

तिथे रस्त्याला पाणी, आम्हाला प्यायला नाही..

डीजीपीनगर (क्र. 1) मधील काही रस्त्यांवर पालिकेतर्फे पाणी मारले जाते. मात्र, वारंवार विनंती-तक्रार करूनही आम्हाला पिण्यापुरतेही देत नाहीत. टंचाईच्या ठिकाणी टॅँकर पाठवला जातो; पण आम्हाला साधा एक टँकर देत नाहीत. मुद्दाम भेदभाव केला जात आहे, असे या महिलांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

यांना जाऊ देऊ नका..

‘पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत महापालिका अधिकार्‍यांना जाऊ देऊ नका,’ असे काही महिला म्हणत होत्या. तेव्हा एक महिला पुढे येऊन म्हणाली, की रस्त्यावरून इमारतीच्या आवारात आणणार्‍या पोलिसांनाही जाऊ देऊ नका, म्हणजे बरोबर चौथ्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचेल.

अन्यथा पोलिसांच्या घरी..

‘रास्ता रोको’मुळे अशोका मार्गावर वाहतूक खोळंबल्याने वरिष्ठ पोलिस अधिकारी तेथे पोहोचले. महापालिकेचे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता यू. एम. धर्माधिकारी व अभियंता व्ही. बी. गाजुलही काही वेळाने दाखल झाले. तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, संतप्त महिला लेखी आश्वासनाच्या मागणीवर ठाम होत्या. त्याला अभियंत्यांनी नकार दिल्याने तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर पोलिसांच्या घरी जेवायला येऊ, असे त्या म्हणताच ‘अहो, आम्ही मध्यस्थी करण्यासाठी आलो आहोत. हे काम पालिकेचे आहे,’ असे सांगून पोलिस अधिकारी बाजूला झाले.

अहो, आमदारांनाही आश्वासन दिले..

पाणीप्रश्नी आमदार वसंत गिते यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. पालिका अधिकार्‍यांनी त्यांनाही ‘लगेच पाणीपुरवठा सुरळीत करतो’ असे आश्वासन दिले आहे. मात्र, ते अजून पूर्ण झालेले नाही, अशी कैफियत महिलांनी मांडली.

तातडीने केला पुरवठा

4नवीन 20 इंची जलवाहिनी टाकली असून, गांधीनगरला व्हॉल्व्ह टाकण्याचे काम बाकी आहे. सध्याची 16 इंची जलवाहिनी तीन-चार भागांसाठी विभागली गेल्याने काही ठिकाणी कमी दाबाने पुरवठा होतो. तसेच, मंगळवारी पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने पुढील दोन-तीन दिवस पुरेसे पाणीच येत नाही. सिद्धिविनायक पार्क, गुरुदत्त आणि र्शी गुरुदत्त सोसायटीत गेल्या तीन दिवसांपासून पुरवठा झाला नाही हे खरे आहे. लगेचच सहा टँकर पुरवठा केला. मंगळवारी पुरवठा बंद ठेवण्याऐवजी दररोज केवळ एक वेळ पाणी द्यावे, अशी माझी मागणी आहे. दोन दिवसांपूर्वीच अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांना एकवेळ पाणीपुरवठय़ाबाबत सूचना केली आहे. सतीश कुलकर्णी, उपमहापौर

10-15 मिनिटेच पाणी..

4वर्षभरापासून एकदाच पाणी येते. महापालिका अधिकार्‍यांना वारंवार सांगितले. आता तर फक्त दहा-पंधरा मिनिटेच पाणी येते. स्वाती कुलकर्णी

शेजारी मिळते पाणी..

4आम्ही चौथ्या मजल्यावर राहतो. शेजारच्या फ्लॅटमध्ये पाणी येते. मात्र, आम्हाला पाणी मिळत नाही. हे असे का होते? हे दुर्लक्षामुळे आणि मनमानी कारभारामुळे होत आहे. मीना निकाळे

डबा बनवणेही मुश्कील.

4वापरायचे पाणी सोडाच; पण प्यायलासुद्धा पाणी नाही. त्यामुळे मुलांसाठी जेवणाचा डबा बनवणेही मुश्कील झाले आहे. पाण्यासाठी इकडे-तिकडे जावे लागते. जान्हवी चौधरी

रडूच कोसळते..

4नोकरदार महिलांना वेळेचे नियोजन करून काम करावे लागते. मात्र, कमी दाबाने पाणी येत असल्याने मोलकरीण महिलाही येत नाहीत. नोकरी आणि पाण्याची अडचण सांभाळताना अक्षरश: रडू येते. तृप्ती कुलकर्णी

ताणामुळे विभाजन

4तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल. एकाच पाइपलाइनवर बराच ताण येत असल्याने पाणी विभागून देण्यात येते. व्ही. बी. गाजुल, अभियंता, गांधीनगर पाणीपुरवठा विभाग

परीक्षेच्या काळात..

4पाणी येत नसल्याने रोजच कुठे पाणी मिळेल यासाठी झगडावे लागते. आमची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. बर्‍याच दिवसांपासून पाणी नसल्याने अभ्यासावर परिणाम होत आहे. संजना फड, तन्मयी चौधरी