आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष सभेत अाज पेटणार ‘पाणी’, भाजप नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मराठवाड्यासाठी गंगापूर धरणातील पाणी साेडल्यामुळे नाशिक शहराला येत्या महिन्यात भयावह पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे बघून शनिवारी (दि. ७) बाेलावलेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवक अाक्रमक हाेण्याची चिन्हे अाहेत. विशेष म्हणजे, या सभेत भाजपवर हल्लाबाेल हाेण्याची शक्यता असून, त्याचा भाजप नगरसेवक कसा सामना करतात वा कसा प्रतिकार करतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार अाहे.
मराठवाड्याला गंगापूर धरणातील पाणी साेडल्यामुळे ४८०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहणार अाहे. मुळात महापालिकेची वर्षभराची पाण्याची मागणी ४६०० दशलक्ष घनफूट अाहे. टंचाई बघून महापालिकेने ४३०० दशलक्ष घनफूट इतकी पाण्याची मागणी केली अाहे. दुसरी बाब म्हणजे, सद्यस्थितीत २० टक्के पाणीकपात करून शहरात पाणीपुरवठा हाेत अाहे. ही सर्व पार्श्वभूमी असताना मराठवाड्याला विराेध झुगारून पाणी साेडल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी अाक्रमक पवित्रा घेतला अाहे. भाजप सरकारने दबाव वापरून पाणी साेडले असले तरी त्यात नाशिक शहराचा विचार झाल्यामुळे काेणत्याही परिस्थितीत ४३०० दशलक्ष घनफूट पाणी अारक्षित ठेवण्याची मागणी नगरसेवककरणार अाहेत. त्यात एक थेंबही कमी हाेऊ नये, यासाठी दबावगटाची निर्मिती केली जाणार अाहे. शनिवारी सकाळी १० वाजता विशेष महासभा महापाैर अशाेक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली हाेणार अाहे.

कसाेटीलागणार : भाजपचेचार अामदार महापालिकेच्या सभागृहाचे सदस्य अर्थातच नगरसेवक अाहेत. मराठवाड्याला पाणी साेडण्याच्या मुद्यावर भाजप वगळता सर्वच पक्षांनी अाक्रमक भूमिका घेऊन नाशिककरांशी असलेली नाळ जपली. या पार्श्वभूमीवर भाजपचे अामदार विशेष सभेत पाणी साेडण्याच्या बाजूने भूमिका घेतात की विराेध करतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार अाहे.