आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Water Issue In Municipal Corporation Meeting Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीप्रश्नी सभापती महापौरांना वरचढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गेल्या मार्चपासून सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्याबरोबरच काही दिवसांपासून संततधार पाऊस आणि गंगापूर धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे यांनी यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले. महापौरांअगोदरच सभापतींनी आदेश काढण्यात बाजी मारल्याने एकाच पक्षात राहून एकमेकांविरुध्द र्शेय लाटण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा सभेनंतर लागलीच रंगली.

उन्हाळ्यात गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता महापौर आणि आयुक्तांनी पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. आता चांगला पाऊस झाल्याने स्थायी सदस्यांनी पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली. त्यावर सभापतींनी तत्काळ निर्णय घेत कपात रद्द करण्याचे आदेश दिले.

त्याचबरोबर महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित आहे का असा टोलाही काही सदस्यांनी लगावला. तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांनी विभागीय अधिकार्‍यांसोबत दौरे करुन पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले. उंटवाडीरोडवरील खड्डा खचण्याबाबत जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली.

सभापतींच्या आदेशाकडे दुर्लक्ष : सभेला आयुक्त उपस्थित राहत नसल्याने सदस्यांनी रोष व्यक्त केला. विविध विषयांवरील चौकशीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश सभापतींनी देऊनही आयुक्त त्याकडे काणाडोळा करत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.