आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या उधळपट्टीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, पाण्याची होते नासधूस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात२० टक्के पाणी कपात लागू करण्यात अाली असताना माेठे हाॅटेल्स, अास्थापना, इमारती अन्य ठिकाणी सुरू असलेली पाण्याची उधळपट्टी थांबविण्यासाठी भरारी पथके नेमून कारवाई करण्याच्या अादेशाला महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी हरताळ फासल्याचे चित्र अाहे. विभागीय अधिकाऱ्यांचा अहवालच येत नसल्याने हतबल पाणीपुरवठा विभागाने विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी अायुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
पाणी कपातीनंतर नागरिकांच्या तक्रारी वाढल्या हाेत्या. नगरसेवकांनी महासभेत कपातीच्या अाडून हाेणाऱ्या उधळपट्टीकडे लक्ष वेधले हाेते. यानंतर महापाैर अशाेक मुर्तडक यांनी विभागीय अधिकाऱ्यांनी घराेघरी जाऊन पाण्याची गळती हाेत असेल तर प्रथम प्रबाेधन गरज पडली तर दंडात्मक कारवाईचे अादेश दिले हाेते. प्रत्यक्षात त्यानुसार विभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही. यासंदर्भात कार्यकारी अभियंता अार. के. पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा करूनही अहवाल मिळत नसल्याची बाब मान्य केली.
निधीकाेठे झिरपला? : गाेदाप्रेमीनागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त अायुक्त जीवन साेनवणे यांची भेट घेऊन नेहरू नागरी याेजना कुंभमेळा विकास अाराखडा मिळून १५१ काेटी रुपये पाणीपुरवठ्यावर खर्च झाले. मात्र, त्यानंतरही पाणीटंचाई का हा निधी काेठे झिरपला, असे प्रश्न केले असून, पाणीपुरवठ्यावरील खर्चाचे अाकडे पालिकेच्या संकेतस्थळावरून घेतल्याचे पत्रकात म्हटले अाहे. या वेळी दिगंबर धुमाळ, उमापती अाेझा, भूषण काळे, देवांग जाेशी, विजय पवार अादी उपस्थित हाेते.

अायुक्तांकडे मांडणार कैफियत...
^विभागीयअधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाण्याची उधळपट्टी वा गळती थांबविण्यासाठी भरारी पथके नियुक्त केली अाहेत. या पथकाला सूचना देऊनही अद्याप कारवाईची माहिती मिळालेली नाही. यासंदर्भात अायुक्तांकडे कैफियत मांडणार अाहे. अार.के. पवार, कार्यकारी अभियंता, महापालिका
पाण्याची होते नासधूस
एकही कारवाई केल्याने महापालिका मेटाकुटीला; अायुक्तांकडून कारवाईची शक्यता
शहरात पाणी कपात सुरू केली असताना दुसरीकडे मात्र अापल्याच प्रभागात पाण्याच्या माेठ्या प्रमाणात हाेणाऱ्या नासधूसकडे लाेकप्रतिनिधी सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सिडकाे, कामटवाडे परिसरात नित्याचे झाले अाहे. मनसे अाणि शिवसेनेच्या बहुतांशी नगरसेवकांच्या प्रभागात दरराेज सकाळपासून अंगणामध्ये तर कुठे रस्त्यावर नळीद्वारे पाण्याचा सडा मारला जाताना दिसून येते. बंगल्यांमधील लाॅन्स, साेसायट्यांच्या पाण्याच्या टाक्या भरून अाेव्हरफ्लाे हाेत पाणी वाया जाताना िदसते. सिडकाेतील पाटीलनगर, सावतानगर, पवननगर, महाले फार्म, कामटवाड्यातील इंद्रनगरी, मटाले मंगल कार्यालयासमाेरील परिसर, खुटवडनगर, धन्वंतरी मेडिकल काॅलेजसमाेरील परिसरात पाण्याचा अपव्यय िदसून येताे.