आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका रुग्णालयांतही पाणीबाणी, अाराेग्याच्या मंदिरातच अाराेग्याला धाेका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालिका रुग्णालयांसह जिल्हा शासकीय रुग्णालयांतील रुग्ण वा त्यांच्या नातेवाइकांची हाेणारी गैरसाेय सर्वश्रुतच अाहे. या रुग्णालयांतील पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही कायम असून, याबाबत अालेल्या काही तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ‘डी. बी. स्टार’ने पाहणी केली असता पाण्यासाठी माेठ्या प्रमाणावर रुग्ण नातेवाइकांची दमछाक हाेत असल्याचे चित्र दिसून अाले.
पाण्याच्या टाकीची अस्वच्छता, नादुरुस्त नळ, गढूळ पाणी, परिसरातील अस्वच्छता यामुळे अाजारांवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांच्याही अनाराेग्यालाच अामंत्रण मिळत असल्याचे दिसून अाले. पदरमाेड करीत विकत पाणी अाणण्यासाठी दाेन मजले चढ-उतर करण्याची वेळ रुग्णांवर येत असतानाही रुग्णालय प्रशासन मात्र डाेळेझाकच करीत असल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे. अाराेग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
नियमितचर्चेत असलेल्या महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, बिटको रुग्णालयासह जिल्हा शासकीय रुग्णालयातही पाण्याचा प्रश्न कायम अाहे. सध्या टंचाईमुळे तर हा प्रश्न अधिकच गंभीर बनला अाहे. शहरातील या तिन्ही प्रमुख रुग्णालयांत रुग्णांना, तसेच रुग्णांच्या नातेवाइकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणीच उपलब्ध करून दिले जात नसल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे. विशेष म्हणजे, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांसाठी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे खरी. मात्र, या टाकीची िकत्येक महिन्यांपासून स्वच्छताच केली जात नसल्याने त्यातून अत्यंत गढूळ पाणी येत असल्याचे धक्कादायक वास्तवही दिसून अाले. अशा स्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी जवळपास इतर कोणताही पर्याय नसल्यामुळे, तसेच िवकत पाण्याची बाटली घेणे शक्य नसल्याने काही जण हेच पाणी वापरत असल्याचेही िदसून अाले. अाराेग्याच्या मंदिरातच अशा प्रकारे अनाराेग्याला अामंत्रण देणारे प्रकार घडत असताना वरिष्ठांकडून मात्र काणाडाेळाच केला जात असल्याने त्यांच्या भूमिकेविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत अाहे.

स्वच्छतागृहातही पाणी नाही...
उन्हाळ्याचीधग नुकतीच जाणवू लागली असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट गेल्या काही दिवसांपासून जाणवत अाहे. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचाही जीव कासावीस होत असल्याच्या तक्रारी अाहेत. या ठिकाणी स्वच्छतागृहातही पाणी नसल्याने माेठी गैरसाेय हाेत असल्याची तक्रारही रुग्णांनी ‘डी. बी. स्टार’कडे केली.

अधिकाऱ्यांसाठीस्वतंत्र सुविधा
एकीकडे पालिका रुग्णालयांसह जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्ण वा त्यांच्या नातेवाइकांची घोटभर पाण्यासाठी वणवण सुरू असताना, दुसरीकडे अधिकारी, डॉक्टर आणि नर्स यांच्यासाठी मात्र स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून िदली असल्याचा प्रकार समाेर अाला अाहे. यामुळेच की काय रुग्णांना नातेवाइकांना पाणी मिळो अथवा मिळो, स्थानिक प्रशासनाला मात्र त्याचे साेयरसुतक नसल्याचे बाेलले जाते.

शस्त्रक्रियेसाठीही स्वच्छ पाणी नाही
महापालिकेच्या बिटको डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात पाण्याची याेग्य सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांना हात धुण्यासाठी तसेच इतर वापरासाठी दाेन मजले उतरून पाणी अाणावे लागत असल्याचे िदसून अाले. रुग्णांनाही दाेन मजले चढ-उतर करण्याची कसरत करूनच पिण्यासाठी पाणी मिळते. अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळेस स्वच्छ पाणीच उपलब्ध राहत नसल्याची माहितीही येथील एका कर्मचाऱ्याने दिल्याने प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार अधाेरेखित हाेताे.

प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे
पालिकेसह सिव्हिलमध्येही पिण्याच्या पाण्याची समस्या अाहे. पदरमाेड करून पिण्यासाठी नेहमी विकत पाणी अाणणे शक्य नाही. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. - मीना शिनगारे, रुग्णाच्यानातेवाईक
रुग्णालयातील पाणी अत्यंत गढूळ...
रुग्णालयात बसवलेल्या पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणावर कचरा आहे. असे पाणी िपल्यास रुग्णांसह नातेवाईकही अाजारी पडण्याची शक्यता अाहे. - अनिता सोनवणे

दोन मजले उतरून अाणताे पाणी..
^रुग्णालयातपिण्याच्यापाण्याची सुविधा नसल्याने माेठी गैरसाेय हाेते. वारंवार दाेन-दोन मजले उतरून पाणी घेण्यासाठी खाली यावे लागते. - नंदा अामले, रुग्ण,डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय
सुरेश जगदाळे, जिल्हाशल्यचिकित्सक

शासकीय रुग्णालयातही पाण्यासाठी हाल
जिल्हाशासकीय रुग्णालयात असलेल्या पाणपोईतून ग्लासभर पाण्यासाठी रांगच लावावी लागते. बाजूलाच नळ आहे. त्याला बारीक धारेत पाणी असते. हा नळ खूपच खाली असल्यामुळे बाटली भरताना मोठ्या प्रमाणावर पाणी वायादेखील जाते. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन याेग्य उपाययाेजना करावी, अशी मागणी अनेक रुग्णांनी केली अाहे.

दूषित पाण्यामुळे अाराेग्य धाेक्यात...
दूषितपाण्यामुळे शहरात सर्वत्र कॉलराची साथ सुरू आहे. यामुळे अनेक रुग्णालयांत अशा रुग्णांची माेठी गर्दी झालेली दिसून अाली. उलट्या-जुलाब या अाजारांमुळे हैराण झालेल्या रुग्णांना या ठिकाणी येऊनदेखील पुन्हा अस्वच्छ पाणीच प्यायला मिळत असल्याने त्यांची प्रकृती अधिक गंभीर हाेत असल्याच्या तक्रारीदेखील अनेक रुग्णांनी केल्या अाहेत. महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात पिण्याच्या पाण्यासाठी बसविण्यात आलेल्या टाकीत मोठ्या प्रमाणावर कचरा, माती साचल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून आली. या टाकीची दुरवस्था हाेऊनही त्यातील पाणी प्यावे लागत असल्याने येथील रुग्णांसह कर्मचाऱ्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली.

बिटको रुग्णालयात ‘पाण्यासाठी दाही दिशा’
जिल्हा रुग्णालयाशी तुलना होणाऱ्या महापालिकेच्या सर्वात मोठ्या बिटको रुग्णालयात अाजघडीला पाण्यासाठी रुग्ण नातेवाइकांची दाही दिशा वणवणच हाेत असल्याचे दिसून अाले. कर्मचाऱ्यांचीही माेठ्या प्रमाणावर गैरसाेय हाेत असून, गेल्या कित्येक महिन्यांपासून रुग्णालयातील महिला, पुरुष कुटुंब नियोजन वॉर्डात नळाद्वारे पाण्याचा एक थेंबही आलेला नसल्याच्या तक्रारी करण्यात अाल्याने भीषण परिस्थितीची प्रचीती अाली.

विकत घ्यावे लागते पाणी
डॉ.झाकिर हुसेन रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना, तसेच नातेवाईक, वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधाच केलेली नसल्याने पाण्यासाठी माेठी वणवण होते. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन या ठिकाणी देण्यात अाली नसल्याने अनेकांना विकतच पाणी अाणावे लागत असल्याचे सांगण्यात अाले.

वॉटर कूलरचीही झाली वाताहत...
डॉ. झाकिर हुसेन बिटको रुग्णालयात रुग्णांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे, यासाठी वॉटर कूलर बसविण्यात आले होते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ते बंद अवस्थेत आहे. रुग्णालयाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या टाकीतही पाण्याअभावी ठणठणाट झाल्याचे िदसून येते.
थेट प्रश्न
* जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा का केली जात नाही?
-रुग्णांसाठी अाता प्रत्येक वॉर्डात पिण्याच्या पाण्याची सुविधा करून देण्यात अाली आहे.
* रुग्णालया- बाहेर लावण्यात आलेल्या नळाची उंची अत्यंत कमी असल्याने माेठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे िदसून येते. तसेच, रुग्णांना पाण्याची बाटलीदेखील भरता येत नाही. त्याचे काय?
-रुग्णालयाच्या बाहेर बांधण्यात आलेल्या पाणपोईबाबत तातडीने माहिती घेताे. नळाच्या उंचीसंदर्भात काही समस्या उद््भवत असल्यास नवीन पाणपोई बांधण्यासाठी बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल. जेणेकरून रुग्णांची गैरसाेय हाेणार नाही.
* डॉ.झाकिर हुसेन रुग्णालयात पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णांची वणवण का हाेते?
-रुग्णांना त्यांच्या नातेवाइकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी रुग्णालयाबाहेर पाण्याची टाकी बसवली आहे.
* रुग्णालयाबाहेरबसवण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणावर कचरा साचला अाहे. हे पाणी पिण्यायाेग्य नसतानाही टाकीची स्वच्छता का हाेत नाही?
-टाकीतील पाणी तत्काळ तपासून टाकीची स्वच्छता केली जाईल. जेणेकरून रुग्णांना स्वच्छ पाणी प्यावयास मिळेल.
* रुग्णालयातीलवॉटर कूलरही बंद आहे. काय कारण?
-डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील बंद वॉटर कूलरची दुरुस्ती करून ते पुन्हा सुरू करण्यात येणार अाहे.