आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या धर्तीवर उस्मानाबादकरांनाही १५ रुपयांत जारचे पाणी मिळणे शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरात पाणी प्रक्रिया उद्योजकांनी नागरिकांना १५ रुपयांत २० लिटर शुध्द पाण्याचे जार विकण्याचा निर्णय घेतला आहे. या धर्तीवर पाण्याची मुबलकता असलेल्या उस्मानाबाद शहरातील पाणी जार विक्रेत्यांकडूनही १५ रुपयांत देणे शक्य आहे. तशी चर्चा उद्योजकांमध्येही सुरू असून, यासाठी पालिकेने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे दुष्काळात शहरातील नागरिकांना, व्यापाऱ्यांना स्वस्तात शुद्ध पाणी मिळेल.
जिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळ पडला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. २०१२-१३ च्या दुष्काळामध्ये शहरी भागात पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी पाण्याचे जार वापरण्याची पद्धत रूढ झाली. दुष्काळाच्या झळा काहीशा कमी झाल्या तरी दोन वर्षात पाण्याच्या जारचा वापर कमी झाला नाही. यावर्षी पुन्हा एकदा प्रखर दुष्काळी परिस्थितीला शहरवासीय तोंड देत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा दाहीदिशा कराव्या लागणार आहेत. सामान्यांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मात्र, त्यांना जारचे पाणी विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे अल्प दरात पाणी मिळावे, यासाठी लातूरच्या धर्तीवर १५ रुपयांत पाणी जार विकणे शक्य आहे का, याचा विचार करून शहरातील पाणीविक्रेत्यांनी तसा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. काही पाणीविक्रेत्यांनी नाव छापण्याच्या अटीवर १५ रुपयांत पाण्याचा जार विकणे शक्य आहे, असे संागितले. मात्र, त्यासाठी पालिकेने पुढाकार घेऊन सर्व उद्योजकांची एकत्रित मोट बांधणे अपेक्षित आहे. सध्या जारच्या पाण्याचे दर निश्चित नसले तरी २५ रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत आकारणी केली जाते. म्हणजे छोट्या कुटंुबात तसेच दुकानांमध्ये दररोज एक जारप्रमाणे महिन्याला ९०० ते १२०० रुपये पाण्यावर खर्च होतात.
पाण्याच्या जारचे दर १५ रुपये केल्यास महिन्याला केवळ ४५० रुपये पाण्यावर खर्च होईल, म्हणजे निम्मी बचत होईल. सामान्यांना हे दर परवडू शकतात. पाण्यासाठी भटकंती थांबून त्यांना शुद्ध पाणीही उपलब्ध होऊ शकते.

उजनीच्यापाण्याचा आधार : उस्मानाबादेत१७५ कोटी रुपये खर्च करून उजनीची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली, मात्र पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना वेळेत आणि मुबलक प्रमाणावर पाणी मिळू शकत नाही. १५ दिवसांतून एकवेळा पाणी येत असल्यामुळे नागरिक साठा करून ठेवलेले पाणी सांडपाणी म्हणून वापरतात. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी जारचाच आधार असतो. सध्या शहराची भूजल स्थिती समाधानकारक असल्याने कूपनलिकांद्वारे पाणी मिळते. त्यामुळे प्रक्रिया उद्योजक अल्प दरात पाणी देऊ शकतात, असे काही उद्योजकांचे मत आहे.
जारच्या पाण्यावर उद्योजकांचे अर्थकारण
२२- उस्मानाबादशहरातील पाणी उद्योग
३०- रुपयेसरासरी दर
६०- जिल्ह्यातीलप्रक्रिया उद्योग
१५- रु.लातूरमधील दर

शहरामध्ये स्वतंत्र कूपनलिका आणि उजनीच्या नळाच्या पाण्याचा वापर केला जातो. बहुतांश कुटुंबांकडे नळाच्या पाण्याला तसेच कूपनलिकेच्या पाण्याला शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. शुद्धीकरणाची सोय नसलेले कुटंुबीय मात्र जारच्या पाण्याला पसंती देतात. त्यामुळे पाण्यावर मोठे अर्थकारण चालते. वर्तमानपत्राप्रमाणे घरोघरी पाण्याचे जार लावण्याची पद्धत रूढ झाली आहे.

दुकानांमध्येही जारचे थंडगार पाणी
प्रक्रिया उद्योजकांनी शहरात घरोघरी तसेच दुकानांमध्ये जाऊन जारचे पाणी विकण्याचा सुरू केलेला व्यवसाय बळ धरत आहे. या व्यवसायाने संपूर्ण शहरातील हॉटेल्स, किराणा, कपड्याची दुकाने, सराफ व्यापारी, शासकीय, खासगी कार्यालये व्यापली आहेत. उन्हाळ्यात थंडगार पाणी मिळत असल्याने ग्राहकांना समाधान मिळते.

शहरातही उपक्रम राबवू
लातूरमध्येहाउपक्रम कशाप्रकारे राबविण्यात आला, याची माहिती घेतो. तसा प्रयत्न उस्मानाबादेत करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे शहरवासियांना टंचाईत आधार मिळेल, यासाठी पुढाकार घेऊ. - प्रशांत रोडे, मुख्याधिकारी,पालिका.

पालिकेनेविचार करावा
लातूरशहरानेघेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. उस्मानाबादेत उजनीच्या पाण्यामुळे पाण्याची कमतरता नाही. पालिकेने नियोजन करून शहरवासियांना वेळेत पाणीपुरवठा करावा. जारचे स्वस्त दरात पाणी देण्याची कल्पना चांगली आहे. पालिकेने त्याचा जरूर विचार करावा. - डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी.