आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांचा पाणीप्रश्न आज महासभेत पेटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठवाड्याला पाणी साेडल्यानंतर सातत्याने नाशिककरांची पाण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या पालकमंत्र्यांसह महापालिका प्रशासनाची चांगलीच हजेरी नगरसेवक महासभेत घेण्याची शक्यता असून, खासकरून मनसे शिवसेनेचे नगरसेवक अाक्रमक हाेण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. १२) हाेणारी महासभा चांगलीच तापण्याची चिन्हे अाहेत.

मराठवाड्याला पाणी साेडल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रथम नाशिककरांना मुबलक पाणी मिळेल, असे सांगितले हाेते. त्यानंतर पाणीगळती कमी करून बचत करावी, असा सल्ला दिला हाेता. प्रशासनानाने जेव्हा अाहे त्या दराने पाणी साेडले, तर ४९ दिवसांचे पाणी कमी पडेल, असे सांगितल्यावर पालकमंत्र्यांनी १३५ लिटर प्रतिमाणसी पाणीवापराचा सल्ला दिला हाेता. याप्रमाणे अंमलबजावणी केल्यास पाणी पुरेल, असे सांगितले हाेते. प्रत्यक्षात साेशल अाॅडिटच्या निमित्ताने प्रतिमाणसी १०० लिटर याप्रमाणेच पाणी मिळण्याची शक्यता समाेर अाली अाहे. १३५ लिटर प्रतिमाणसी याप्रमाणे पाणीपुरवठा सुरू ठेवला, तर ४९ दिवसांचे पाणी कमी पडणार असल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर नाशिककरांची दिशाभूल केल्याच्या मुद्यावरून भाजप अामदार तथा नगरसेवकांना धारेवर धरले जाण्याची चिन्हे अाहेत. लक्षवेधी सूचनेद्वारे या मुद्यावर प्रशासनाला अडचणीत अाणले जाण्याची शक्यता अाहे.

महापालिका अायुक्तांची साक्ष : महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम हे भटक्या विमुक्त जाती-जमाती समितीच्या सुनावणीसाठी मुंबईला जाणार असल्यामुळे महासभेला अनुपस्थित राहणार अाहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आता अतिरिक्त अायुक्त कशा पद्धतीने खिंड लढवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार अाहे.