आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात पाणी गळतीच्या तक्रारींचा पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पाण्याचा थेंबन् थेंब वाचवण्यासाठी सुरू झालेल्या अभियानाचा एक भाग म्हणून अधिकार्‍यांकडे गळतीसंदर्भात थेट तक्रार करण्याच्या सुविधेचा नागरिकांनी पुरेपूर फायदा उचलला आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरातील सहाही विभागांत अधिकार्‍यांचे भ्रमणध्वनी खणखणू लागले असून, गळतीसंदर्भातील तक्रारी आल्यानंतर तातडीने निपटाराही होत असल्याचा दावा केला जात आहे.

पंचवटीत 15 तक्रारी : पंचवटी विभागीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागात पंधरा तक्रारी आल्या. पाणीपुरवठा अधिकारी आर. एम. शिंदे यांना आठ, तर एम. एच मोमीन यांना सहा तक्रारी आल्या. बहुतांश तक्रारी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या मोठय़ा पाणीगळतीची प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करण्यात आल्या. तक्रारी अहवालस्वरूपात सादर करून कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल.

जुन्या नाशिकमध्ये गळती : जुने नाशिक परिसरात जुन्या जलवाहिन्यांतून होणार्‍या पाणीगळतीबाबत अनेक तक्रारी केल्या जात होत्या. संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिल्यानंतर पूर्व विभागातील अभियंता यू. डी. सोनवणे यांना पाणी गळतीसंबधी एक तक्रार आली. तर अभियंता व्ही. डी. माडीवाले यांच्याकडे दहा तक्रारी आल्या. जुने नाशिक भागात पाणी गळतीचे प्रमाण अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाशिकरोडला 15 तक्रारी : नाशिकरोड विभागात पाणीगळतीच्या 10 तक्रारी आल्या. नाशिकरोड विभागातील अभियंता एन. के. पाटील यांना जयभवानी मार्गाकडील पाणी गळतीसंदर्भात जवळपास 15 दूरध्वनी आले. तक्रार केंद्रातील दूरध्वनीवर नागरिकांनी तक्रार केलेली नव्हती.

सातपूरला दोनच तक्रारी : सातपूर विभागात गळतीसंदर्भात दोन तक्रारी आल्याचे उपअभियंता ए. व्ही. जाधव यांनी सांगितले. र्शमिकनगर व सावरकरनगरमधील तक्रारी होत्या. यातील एका तक्रारीचे निराकरण झाले.