आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर वर्षभरानंतर बसले गंगापूर धरणावर पाणीमीटर, तीन दिवसांच्या चाचणीनंतर पूर्णवेळ कार्यरत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूर धरणावरील बंद असलेले पाणीमीटर अखेर वर्षभरानंतर बसविण्यात आले. पुढील तीन दिवस या मीटरची चाचणी सुरू राहाणार असून, त्यानंतरच ते पूर्णवेळ कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मनपाला पाण्यात कुठलाही गफला करता येणार नसून, दररोजच्या पाणी वापरातही पारदर्शकता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऐन दुष्काळात थेंबन् थेंबाचे नियोजन केले जात असताना मनपाने मात्र गंगापूर धरणावरील आपले पाणी उचलण्यात येणारे मीटर तब्बल वर्षभरापासून बंदच ठेवत ..गंगापूर धरणावर पाणीमीटर धरणातून अंदाजेच पाण्याची उचल सुरू ठेवली होती. हीच बाब ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणल्यानंतर लागलीच भाजपच्या गटनेत्यांनीही आमदारांसह मीटर बंदची खात्री करत त्वरित ते बसविण्याचे पत्रच आयुक्तांना दिले. त्यानंतर आयुक्तांनी यातील जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उचलला. जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट केल्याने धावपळ झालेल्या महापालिकेने वर्षभरापासून बंद असलेले मीटर पुढील दिवसांतच बसविले. गुरुवारी रात्रीच हे मीटर बसवित त्याची चाचणीही सुरू केली आहे. पुढील २-३ दिवस चाचणी सुरू राहाणार आहे. त्यानंतर आलेल्या रिंडिंग आणि इतर बाबींची खात्री केल्यानंतरच मीटर कायम केले जाणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
१५ फेब्रुवारीलाच देण्यात अाली वर्क अाॅर्डर
मीटरची निविदाडिसेंबर महिन्यातच काढली होती. १५ फेब्रुवारीला त्याची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. त्यानुसार मीटर बसविण्यात अाले असून, २-३ दिवसांच्या चाचणीनंतर ते पूर्णवेळ कार्यान्वित केले जाणार अाहे. -यू. बी. पवार, अधीक्षकअभियंता, मनपा
दोन मीटरची किंमत लाख ५० हजार
धरणावर बसविण्यात आलेल्या दोन्ही मीटरची किंमत लाख ५० हजार रुपये अाहे. पी अॅण्ड एच कंपनीच्या या मीटरमध्ये सॉफ्टवेअर फ्रान्सचे, तर हार्डवेअर भारतीय बनावटीचे आहे. अत्यंत उच्च दर्जाचे अाणि दीर्घकालीन वापरासाठी ते याेग्य असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.