आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपूरला जलवाहिनी फुटल्याने लाखाे लिटर पाण्याची नासाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर - शहरावर दुष्काळाची छाया असताना नागरिकांना थेंबन् थेंब पाणी वाचविण्याचे अावाहन करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रभाग क्रमांक ५० मध्ये पाणीपुरवठा करणारी फूट व्यासाची जलवाहिनी गुरुवारी सकाळी अचानक फुटली. यामुळे लाखाे लिटर पाणी वाया गेले असून, परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले हाेते. जलवाहिनी फुटण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त हाेत अाहेत.
सातपूर-सिडकाेत पाणीपुरवठा करण्यासाठी २० वर्षांपूर्वी सिमेंटची जलवाहिनी टाकली हाेती. मात्र, उच्च दाबामुळे नेहमीच ही वाहिनी फुटत असल्याने पालिका प्रशासनाने सिडकाे परिसरासाठी लाेखंडी जलवाहिनी टाकली अाहे. त्यामुळे सिमेंट जलवाहिनीद्वारे प्रभाग क्रमांक ५० मधील जाधव संकुल, चुंचाळे शिवार, बजरंगनगर, केवल पार्क, संजीवनगर, मळे परिसराला पाणीपुरवठा केला जाताे. ही वाहिनी काढून या परिसरासाठी लाेखंडी जलवाहिनी टाकण्याची मागणी प्रभागाचे नगरसेवक सचिन भाेर यांनी वारंवार केली अाहे. मात्र, पालिकेकडून याबाबतचा पाठपुरावा केला जात नाही. त्यामुळे एेन दुष्काळी स्थितीत एकाच महिन्यात दुसऱ्यांदा जलवाहिनी फुटून लाखाे लिटर पाण्याचा अपव्यय झाला अाहे. पालिकेच्या वतीने दर गुरुवारी पाणीकपात केली जात असल्याने याेगायाेगाने गुरुवारी सकाळच्या वेळेतच जलवाहिनी फुटल्याने फक्त जलवाहिनीतील शिल्लक लाखाे लिटर पाणी वाया गेले. दरम्यान, या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात अाले असून, शुक्रवारपर्यंत काम पूर्ण हाेण्याची अपेक्षा नगरसेवक भाेर यांनी व्यक्त केली.

जातीने लक्ष घालणार
^सिमेंटची जलवाहिनी बदलण्यासाठी वेळाेवेळी अावाज उठविला अाहे. यापुढे मी या प्रकरणात जातीने लक्ष घालेन. तसेच, प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, शुक्रवारी नागरिकांना पाणी मिळेल. - सचिन भाेर, नगरसेवक