आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच पाणीकपातीच्या मुहूर्ताला प्रशासनाचा ‘खाे’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाठवड्यातून एक दिवस पाणी बंदची मंगळवारपासून हाेणारी अंमलबजावणी लांबणीवर पडली असून, पालकमंत्र्यांचे ताेंडी वा लेखी अादेश नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने कपातीबाबत महापाैरांच्या अादेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे वृत्त अाहे. मनसे भाजपच्या भांडणात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी माैन बाळगले असून, याचा परिणाम म्हणजे नाशिककरांना उन्हाळ्यात भयावह पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असे दिसत अाहे.
गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी साेडल्यानंतर नाशिक महापालिकेच्या पाणी अारक्षणात जबरदस्त फटका बसला. जेथे ४६०० दशलक्ष घनफूट पाणी अपेक्षित हाेते, तेथे ३२०० दशलक्ष घनफुटांपर्यंतच पाणी अारक्षण मंजूर झाले. त्यातही कमी झालेले पाण्याचे समर्थन करताना नाशिकमध्ये गळतीचे प्रमाण जास्त अाहे, किंबहुना साेशल अाॅडिटच्या माध्यमातून नाशिककरांनाच उधळपट्टीखाेर सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, महासभेने शिल्लक पाणी ३१ जुलैपर्यंत पुरवण्याचे नियाेजन करून अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, पालकमंत्र्यांनी मुबलक पाणी असल्याचे सांगत कपातीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. काही दिवसांनंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महापाैरांना लेखी पत्र देऊन पाणीकपात वाढवली नाही तर जूनच्या मध्यावधीतच पाणी संपेल, अशी भीती व्यक्त केली. अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले तर १० जुलैपर्यंतच पाणी पुरेल, असेही स्पष्ट केले हाेते. थाेडक्यात अाठवड्यातून दाेन दिवस पाणी बंद ठेवावे, असे अप्रत्यक्षपणे महापालिकेची सूचना हाेती. त्यावर महापाैर अशाेक मुर्तडक यांनी शहराचे हित लक्षात घेत अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद करण्याबाबत मंगळवारी म्हणजेच २६ जानेवारीपासून अंमलबजावणी करावी, असे अादेश दिले हाेते. या अादेशानंतर महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सद्यस्थितीत असलेल्या पाणीसाठ्याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले हाेते. दरम्यान, २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला काेणताही निर्णय झाला नसल्याने अाता मंगळवारी शहरात पाणीपुरवठा हाेईल की नाही याविषयी संभ्रमाचे वातावरण हाेते. यासंदर्भात पालिका अायुक्तांपासून एकाही अधिकाऱ्याने उघडपणे प्रतिक्रिया दिली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कपातीबाबत अादेश अालेले नाहीत. पाण्यावरून भाजपला घेरण्याची तयारी राजकीय पक्षांची असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परस्पर कपात केल्यास मंत्र्यांची नाराजी परवडण्याजाेगी नाही. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी ताक फुकूंन पिण्याची भूमिका घेताना दिसत अाहेत.

शहराच्या हिताचा निर्णय घेणार
^राजकारण करण्यापेक्षा नेमका किती पाणीसाठा शिल्लक अाहे, हे बघून पाणी किती कसे पुरवायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. पालकमंत्री नाशिक दाैऱ्यावर असून, त्यांच्याशी चर्चा करून शहराचे हित बघितले जाईल. लाेकांनी निश्चिंत राहावे. बाळासाहेब सानप, शहराध्यक्षतथा अामदार, भाजप

मनसे-शिवसेना घेरणार भाजपला
यापूर्वीचमनसे शिवसेनेने अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद करावे, अन्यथा जर पाणी पुरणार असेल तर तशी जबाबदारी पालकमंत्र्यांनी घेऊन अाकडेवारी सादर करावी, असे अाव्हान दिले हाेते. पाण्याबाबत भाजपकडून छुपा हस्तक्षेप हाेत असल्याचे चित्र बघून प्रजासत्ताकदिनापर्यंत मनसे शिवसेना अाक्रमक भूमिका घेण्याची शक्यता अाहे.

अाता प्रशासनाची जबाबदारी
अाठवड्यातून एक दिवस पाणी बंदचा निर्णय महासभेने घेतला. मात्र, प्रशासनाकडून याबाबतचा अादेश पाळला जात नाही. त्यामुळे पाणी ३१ जुलैपर्यंत पुरवून दाखवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, लाेकांना पाणी मिळाले नाही तर मात्र प्रशासनाची गय केली जाणार नाही.-अशाेक मुर्तडक, महापाैर