आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत पोलिसांच्‍या पत्‍नी, पाणीप्रश्नावर केले रास्‍ता रोको आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - पाथर्डी फाटा, वासननगर येथील पोलिस वसाहतीत गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा हाेत नसल्याने संतप्त महिलांनी शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास थेट रस्त्यावर उतरत दाेन तास आंदोलन केले. अांदाेलनकर्त्या महिला या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नी असल्याने या महिलांची समजूत घालताना पोलिस अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले हाेते. रविवारी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे अाश्वासन दिल्यानंतर महिलांनी अांदाेलन मागे घेतले.

प्रभाग ५२ मधील ही पोलिस वसाहत घंटागाडी येणे, अस्वच्छता अशा समस्यांचे अागर बनली आहे. या भागातील नगरसेवक येथे फिरकतही नाहीत. येथील रहिवासी हे मतदार नसल्याने या वसाहतीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिलांनी केला. तांत्रिक अडचणींमुळे चार दिवसांपासून वसाहतीतील पाणीपुरवठा बंद अाहे. प्रशासनाने टँकर पाठविल्यानंतर टँकरचालकाने पैशाची मागणी केल्याची तक्रार महिलांनी केली. नगरसेवक वंदना बिरारी, सुदाम कोंबडे पाणीपुरवठा अधिकारी संजीव बच्छाव यांच्याकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने महिलांनी आंदोलन केले. सुनीता जोंधळे, नलिनी दराडे, छाया टोपले, रत्ना आहेर, रूपाली पाटील, अनिता बागुल, ललिता निकम आदींसह ३०० महिलांनी अांदाेलनात सहभाग घेतला.

प्रशासनाकडे पाठपुरावा
महिलांनी आंदोलन केले असल्याचे समजताच मी आंदोलनस्थळी पोहोचले. महिलांची समजूत काढली. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देऊन तत्काळ पाण्याचा टँकर मागविला. या ठिकाणी जलवाहिनीचे काम सुरू केले. सीमा हिरे, आमदार

तांत्रिक अडचण
गंगापूर धरणापासून शिवाजी नगरपर्यंत एक व्हाॅल्व्ह खराब झाला होता. तो दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. शिवाय, वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अडचणी झाल्या. मात्र, आता टँकरनेे पाणीपुरवठा केला आहे. संजीव बच्छाव, पाणीपुरवठा अधिकारी, सिडको
वाहतूक कोंडी
वासननगर येथील सर्व्हिसरोडवर हे आंदोलन सुरू होताच वाहतूक कोंडी झाली. महिलांच्या राैद्रावतारामुळे पोलिस अधिकाऱ्यांनाही आंदोलन नियंत्रणात आणता येत नव्हते. मात्र, येथील नगरसेवक सुदाम कोंबडे नगरसेविका वंदना बिरारी यांनी नागरिकांशी चर्चा करण्यासाठी येणे गरजेचे होते. ते आल्याने महिलांनी संताप व्यक्त केला.