आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाठवड्यातील दाेन दिवस पाणी बंदच्या हालचाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चौदा लाख लाेकांच्या पाणीप्रश्नाचा विचार करता मराठवाड्याला पाणी दिल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे गडद ढग नाशिकवर पसरले अाहेत. मंत्रालयातील बैठकीत जुलैपर्यंतच्या २७३ दिवसांसाठी २७०० दशलक्ष घनफूट पाणी अारक्षित झाल्यामुळे अाता अाठवड्यात दाेन दिवस पाणी बंद ठेवण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या अाहेत.

गंगापूर धरण समूहातून महापालिकेने अाॅक्टाेबर ते जुलै या कालावधीकरिता ४६०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली हाेती. मात्र, दुष्काळी परिस्थिती, गंगापूर धरण समूहातील ६५ टक्क्यांपर्यंतचा पाणीसाठा लक्षात घेत महापालिकेने स्वत:हून ३०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी कमी केली. त्यानंतर अाॅक्टाेबरमध्ये २० टक्के पाणीकपातीची अंमलबजावणीही केली. महापालिकेचा राेजचा पाणीपुरवठा ४१० एमएलडी इतका असून, राेज ६० एमएलडी पाणीकपात करण्यात अाली. दरम्यान, मराठवाड्याला एक हजार दशलक्ष घनफूट पाणी साेडल्यामुळे महापालिकेच्या ताेंडचे पाणी पळाले अाहे. त्यात मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्याचे पाणी अारक्षण जाहीर करताना महापालिकेच्या वाट्याला २७०० दशलक्ष घनफूट पाणी दिल्यामुळे महापालिकेत अाता येणारे २७३ दिवस पाणी कसे पुरवून वापरायचे, असा पेच निर्माण झाला अाहे. अारक्षण बैठकीनंतर शहरात तीन दिवसांअाड एक दिवस पाणी बंद ठेवण्याच्या प्रस्तावाबाबत हालचाली सुरू झाल्याचे समजते.

येत्या नऊ महिन्यांत २८ हजार एमएलडी पाणीबचत
जेणेकरून अाठवड्यातून दाेन काेरडे दिवस पाळता येतील साधारण त्या माध्यमातून महिन्यातील दिवस पाणीपुरवठा बंद राहील. त्यातून ३२०० एमएलडी पाण्याची बचत हाेणार अाहे. येत्या नऊ महिन्यांत २८ हजार एमएलडी पाणी वाचणार अाहे. हे महिने राेज ३५० एमएलडी याप्रमाणे वापरल्यास जवळपास ७२ दिवस पाणीपुरवठा करता येईल. म्हणजेच जवळपास अडीच महिन्यांचा पाणीसाठा भविष्यात वापरता येईल.

अाज अाणि उद्या पाणी बंद
गंगापूर धरणातील पंपिंग स्टेशनमध्ये नवीन एनर्जी मीटर बसविणे, दुरुस्ती, गळती अन्य कामांसाठी मंगळवारी (दि. २४) सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत वीजपुरवठा खंडित हाेणार असल्याने मंगळवारी दुपारी सायंकाळी तसेच बुधवारी (दि. २५) सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती अधीक्षक अभियंता अार. के. पवार यांनी दिली. नगरसेवकांनी ‘पाणी बंद’बाबत महापालिकेकडून माहिती मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.