आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारव अन‌् विहिरी नाहीशा, पाणीटंचाईची तीव्र समस्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भीषण टंचाईवर मात करण्यासाठी अगदी लहान-लहान प्रकल्प हाती घेत त्यातून पाणी कसे उपलब्ध करता येईल यासाठी शासकीय विभागांसह, स्वयंसेवी-सेवाभावी संस्था, एवढेच काय तर खासगी कंपन्या, शेतकरी असे सर्वच स्तरांवर प्रयत्न केले जात आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी नैसर्गिक स्त्रोत जिवंत करण्यासाठी भारतीय जलसंस्कार मंडळ युद्धपातळीवर काम करत आहेत. एवढेच काय तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचीही कमी झालेली सिंचन क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढण्याचे अवघड काम वेगाने सुरू आहे.
याच्या अगदी उलट काम शहरात असलेल्या सार्वजनिक अर्थात महापालिकेच्या मालकीच्या तसेच काही खासगी मालकीच्या विहिरी, बोअरवेलबाबत सुरू असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर आले आहे. शहरातील नेहरू चौक, पिंपळपार परिसरात काही सार्वजनिक विहिरी बुजवित तेथे खासगी लोकांनी थेट घरेच बांधली आहेत. येथील बारवही बुजवित त्यावर अतिक्रमणे केली जात आहे. जुने नाशिकमधील खडकाळी परिसरातील जुनी बारव बुजविण्यात आली आहे. या सर्वच विहिरी आणि बारवांना आजही मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक पाणी असून ती जिवंत केल्यास संपूर्ण शहराची तहान भागविली जाऊ शकते. अशाच काही विहिरी दसक, पंचक, म्हसरुळ, मखमलाबाद, आनंदवल्ली शिवार, अंबड, कामटवाडे, सातपूर अशा संपूर्ण शहरातच आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याने पालिका प्रशासनाबाबतच अाता संशय व्यक्त केला जात आहे.

इंद्रकुंडातील पाण्याचीही चोरी : अरुणानदीवरच इंद्रकुंड बांधले आहे. येथे जिवंत पाणी आहे. दररोज दोन-तीन तास हे पाणी मोटरद्वारे उपसले जाते. कधी ते गटारीत सोडले जाते तर अनेकदा त्याची चोरीच केली जाते. अाजच्या स्थितीत थेंब न् थेंब वाचविणे आवश्यक असताना एवढे हजारो लिटर पाणी हे केवळ पालिकेच्या कामचुकारपणामुळेच वाया जात आहे.
यू. बी. पवार, अधीक्षकअभियंता, नाशिक महापालिका

विहीर बुजवण्यास तीव्र विराेध
^जलस्त्रोत उघडे केले जात असतानाही मनपाच्या उद्यानातील सार्वजनिक विहीर काही व्यक्ती त्यात अंधश्रद्धेच्या नावाने बुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, दुष्काळी स्थिती आणि या उद्यानाचा विचार करता विहिरीचे पाणी उद्यानाच्या विकासासाठीच वापरता येईल. ती बुजविणे चुकीचे आहे. आम्ही ते करू देणार नाही. - शेखर वंडेकर, स्थानिकनागरिक

पालिका उद्यानातील ही विहीर बुजविण्याचा घाट घातला जात अाहे. मात्र, याच विहिरीतील पाणी शुद्धीकरण करून वापरल्यास दुष्काळात एक माेठा अाधार मिळेल, याकडे दुर्लक्ष केले जात अाहे.

विहिरी अाणि बारवांची स्थिती वाईट
{ केरकचऱ्याने विहिरी बारव बुजविले जात अाहेत. त्यामुळे जलस्त्राेत मंदावले असून, काही तर बंदच झाले अाहेत.
{ उपसा नसल्याने पाण्याला हिरवट रंग आला आहे.
{ पाण्यातून दुर्गंधी येत असून, प्रदूषण वाढले अाहे.

येथील विहिरी बुजविल्या
जुनेनाशिक परिसरातील खडकाळी बारव, वाकडी बारव, तिळभांडेश्वर लेन येथील तिळभांडेश्वर मंदिराच्या भिंतीलाच लागून असलेली विहीर, गोदाघाटावरील लक्ष्मणकुंडाजवळील विहीर, होळकर पुलाखालील विहीर हे सार्वजनिक नैसर्गिक स्त्रोत बुजविण्यात आले अाहेत. तसेच खासगी जागेतील, जुन्या वाड्यांतील विहिरीही बुजविण्यात आल्या आहेत. परंतु, या विहिरींवर संबंधित मालकांचाच हक्क असल्याने त्याबाबतचा निर्णय सर्वस्वी त्यांचाच असल्याने कमीतकमी सार्वजनिक स्त्रोतांना अाजच्या दुष्काळी स्थितीत पुनर्जीवित करण्याची आवश्यकता अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

दृष्टिक्षेपात...
{महापालिकेच्या मालकीच्या १३१५ बोअरवेल आहेत. त्यापैकी ९१३ बाेअरवेलला हातपंप, तर ४०२ बाेअरवेलला विजेचे पंप लावण्यात अालेले आहेत.
{ महापालिकेच्या मालकीच्या २६ विहिरी असून, त्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. त्यात प्रचंड पाणीसाठा आहे. शिवाय १७ विहिरींना वीजपंप अाहेत. असे असतानाही त्यांचा वापर आजच्या दुष्काळी स्थितीत मनपा का करत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
{ महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार खासगी मालकीच्या १२२ विहिरींना वीजपंप लावण्यात अाले अाहेत. तर ९६ विहिरींना पंपाची व्यवस्था नाही. या विहिरी खासगी असल्या तरीही दुष्काळी स्थितीत पालिका कायद्यानुसार त्यावर आपला हक्क सांगू शकते. त्यामुळे या विहिरीतील पाणीही पालिका प्रशासनाला वापरता येईल.

प्रथम तात्पुरते अतिक्रमण, नंतर मात्र होते कायम
शहरातील सार्वजनिक विहिरी, बारव बुजविण्याची प्रक्रिया एकाच दिवसात घडली नाही. प्रथम तेथे व्यक्ती अथवा संस्थांनी तात्पुरत्या स्वरूपाची अतिक्रमणे उभारली, त्यानंतर हळूहळू ती कायम केली. पत्र्यांची शेड, लोखंडी जाळी, लाकडाच्या झाकणाचे रूपांतर नंतर कायम स्वरूपाच्या पक्क्या अतिक्रमणांमध्ये झाले. शासकीय यंत्रणेच्या, स्थानिकांच्या डोळ्यात धूळफेक करत नंतर त्यावर थेट इमारतीच उभारल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत िदसून आले आहे.

गोदाघाटावरील विहिरींवर पालिकेचेच काँक्रिटीकरण...!
खासगी अतिक्रमणधारकांकडून अतिक्रमणे करत हे स्त्रोत बुजविले जात असतानाच महापालिकाही त्यात मागे नाही. गोदाघाटावरील लक्ष्मणकुंडाजवळील स्वयंभू कर्पुरेश्वर महादेव मंदिराच्या अगदी मागील बाजूस असलेली विहीर मनपाने २००३ च्या कुंभमेळ्यात बुजविली आहे. तसेच होळकर पुलाखालील बारवही मनपाने बुजविले. मोठ्या प्रमाणावर पाणी असतानाही विहीर-बारव बुजविण्याचे पातक पालिकेने स्वत:च केले. त्यावर काँक्रिटीकरण केल्याने त्याचा परिणाम लक्ष्मणकुंड आणि रामकुंड आज कोरडेठाक पडत असून, शहरालाही तेथून ऐनवेळी पाणी उपलब्ध होण्याचा पर्याय आता बंदच झाला आहे.

पालिकेने लक्ष घालणे गरजेचे
^रामकुंडअर्थातगोदावरी परिसरासोबत शहरातील सर्वच जुन्या विहिरी, बारव, बोअरवेल असे नैसर्गिक स्त्रोत खुले केले पाहिजे. त्यांचा उपयोग आजच्या दुष्काळासारख्या स्थितीत होईल. महापालिकेने त्यात लक्ष घालणे गरजेचे आहे. - देवांग जानी

रामकुंड, तिळभांडेश्वर मंदिर परिसरातील, तसेच शहरातील काही खासगी जागांवरील विहिरी अाज पूर्णत: नाहीशा झाल्याचे दिसून अाले.
जुन्या नाशकातील हे बारव अाजही अनेक कुटुंबांसाठी माेठा अाधार ठरत अाहे. अशी कित्येक बारव बुजवण्याचा घाट घातला जात अाहे, ज्याला विराेध हाेणे गरजेचे बनले अाहे.
थेट प्रश्न
दुष्काळी स्थितीमुळे पाण्याच्या थेंब न् थेंबाची बचत केली जात आहे. खेड्यापाड्यात, वाडी-वस्त्यांवरच नव्हे, तर शहरातही हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत अाहे. एकीकडे असे भीषण चित्र असताना दुसरीकडे मात्र एकेकाळी संपूर्ण नाशिक शहरातील पिण्याच्या पाण्याची मदार असलेल्या, विहिरी, बारव यांच्यासह पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बुजविण्याचा घाट शासकीय यंत्रणांसह खासगी मालक आणि अतिक्रमणधारकांकडून घातला जात असल्याचे वास्तव ‘डी. बी. स्टार’च्या निदर्शनास आले आहे. अनेक विहिरी आणि बारव यापूर्वीच बुजविली असून, शिल्लक असलेल्यांनाही स्वार्थासाठी बुजविण्यात येत असताना पालिका आणि शासकीय यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करत अाहे. अशा स्थितीत पालिका नव्याने बोअरवेल घेण्याचे सांगत वेळ मारून नेत आहे. त्यावर हा प्रकाशझोत...
पाण्यासाठी विहिरी, बोअरवेल खोदल्या जात असताना भरपूर पाणी असलेल्या जुन्या विहिरींना बुजवित आपलं उखळ पांढरं करणाऱ्याचं काम काही स्वार्थी लोकांकडून सुरू आहे. कॉलेजरोड येथील जेबीनगर, निर्माणनगर येथील महापालिकेच्या उद्यानात एक भरपूर पाणी असलेली विहीर आहे. परंतु, ही विहीर बुजविण्याचा घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे, विहिरी बुजविण्यासाठी महापालिका अायुक्तांसह, जिल्हाधिकाऱ्यांनाही साकडं घालण्यात आलं आहे. परंतु, त्याला तेथीलच काही स्थानिकांनी विरोध करत ही विहीर दुष्काळी स्थितीत उपयोगी पडू शकते. शिवाय या उद्यानात उत्तम हिरवळ, कारंजे, विविध शोभेची झाडे लावत त्यांना पाणी देण्याची सोय या विहिरीच्या माध्यमातून सहजपणे होऊ शकते. नियमित पाण्याचा उपसा होत असल्याने विहिरीचे पाणीही स्वच्छ आणि शुद्ध राहण्यास मदत होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यांनी नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. अाता यासंबंधी प्रशासनाकडून हाेणाऱ्या िनर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागून अाहे.
{दुष्काळी स्थितीत सार्वजनिक तसेच खासगी बुजविलेल्या विहिरी-बारव खुले करण्याचे नियोजन आहे काय?
-बुजविलेल्या विहिरी अथवा बारव पुन्हा खोदण्याचे नियोजन नाही. पण आहे त्यांचा सर्व्हे आम्ही केला अाहे. गरज पडल्यास या विहिरींचे, बारवांचे पाणी वापरू शकणार आहोत.

{विहिरी आणि बारवांवर अतिक्रमण करत ती बुजविली जात आहेत, त्यावर काय कारवाई करणार?
-खासगी आणि सार्वजनिक विहिरी आणि बारवांचा समावेश असल्यास नक्कीच कठोर कारवाई करू. पण, खासगी असल्यास त्याबाबत कायद्यातील तरतुदींचा आधार घेतल्याशिवाय बोलता नाही येणार.

{दुष्काळी स्थितीतआपण पर्यायी पाण्याचा स्त्रोत म्हणून या विहिरी आणि बारवांचा वापर करणार का?
-नक्कीच करणार. त्याबाबत शहरातील २०० ते २२५ खासगी विहिरींचा सर्व्हे केला आहे. गरज पडल्यास लागलीच त्या अधिग्रहित करू.

{वारंवार येणाऱ्यादुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेची काही भविष्यकालीन योजना आहे काय?
-अस्तित्वातील विहिरी आणि बारवांच्या पाण्याचा उपयोग केला जाईल. त्याचबरोबर आगामी काळात गरजेनुसार शहरात १००० ते १२०० बोअरवेल खोदण्याचेही नियोजन आहे. त्याचबरोबर या विहिरी आणि बोअरवेलचे पाणी साठविण्यासाठी त्या-त्या भागात ३००० ते ५००० लिटर्सच्या पाण्याच्या टाक्याही बसविणार आहोत.