आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक स्रोत देऊ शकतात जलसंजीवनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिककरांवर अाता दिवसाअाड पाणीपुरवठा करण्याचे भयसंकट दाटून अाले अाहे. १९९२ नंतर शहरासह जल्ह्यात पाण्याची प्रथमच इतकी भयावह स्थिती अाहे. यातून मार्ग कसा काढता येईल, याकडे अधिक सजगतेने पाहणे क्रमप्राप्त ठरते. सद्यस्थितीत शहरातील विहिरी अाणि बारव हे नैसर्गिक स्रोत दुष्काळावर मात करण्यासाठीचा उत्तम पर्याय असून, या जलस्रोतांना जिवंत केल्यास गंगापूर धरणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. जागतिक जलदिनानिमित्त या स्रोतांसह जलजागृतीसाठी करण्यात येणाऱ्या कामांचा धांडाेळा घेणारा हा स्पेशल रिपाेर्ट...
त्र्यंबकेश्वरचा प्रयागतीर्थ तलाव
त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ असलेला हा प्रसिद्ध तलाव अहिल्यादेवी हाेळकर यांनी बांधलेला अाहे. दक्षिणेला असलेल्या टेकड्या डोंगरांवर पडणारे पावसाचे पाणी उताराने जेथून वाहते तेथेच हा तलाव आहे. त्यामुळे पाण्याचा स्रोत पक्का आहे. त्याची अष्टकोनी रचना, वेगवेगळ्या पातळ्यांवरून पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था, चार बुरूजांसारख्या वास्तू यामुळे पाहताक्षणी हा तलाव नजरेत भरतो. पूर्वी या तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी, इतर वापरासाठी, शेतीसाठी अाणि जनावरांसाठी केला जात असे. अाता धार्मिक प्रदक्षिणेसाठी या तलावाचा वापर हाेताे.
नाशिकमध्येही बाराही महिने पाणी असणाऱ्या विहिरी अाहेत. यात महापालिकेच्या मालकीच्या २६ विहिरी असून, खासगी मालकीच्या १२२ विहिरी अाहेत. या विहिरी खासगी मालकीच्या असल्या तरी त्याच्या पाण्यावर मात्र महापालिका कायद्याप्रमाणे हक्क सांगू शकते. विशेषत: दुष्काळी परिस्थितीत या विहिरींचा वापर करणे अावश्यक अाहे. अाज अशा असंख्य विहिरी अाहेत ज्यांचे जलस्रोत प्रदूषणामुळे अथवा दुर्लक्षामुळे बंद पडले अाहेत. महापालिकेने अशा विहिरींना मृत म्हणून घाेषित केले अाहे. परंतु, शास्त्रीय पद्धतीने खोदाई केल्यास या विहिरींचेही जलस्रोत खुले हाेऊन त्यांचा वापर दुष्काळी परिस्थितीत हाेऊ शकताे, असे तज्ज्ञांचे मत अाहे.
नाशिक शहराची भाैगाेलिक रचना अाणि जलस्रोतांची संख्या पाहता या नैसर्गिक बाबी दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंजीवनीसारख्या ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे मत अाहे. यात जुन्या विहिरी, बारव, तळी, तलाव, कुंड, टाकी, बांध-कालवे आदी जलस्रोत अाता नाशिककरांसाठी जलसंजीवनी ठरणार अाहेत. धरणात सध्या उपलब्ध असलेले पाणी अाणि नैसर्गिक जलस्रोतांना पुनर्जीवित करून उपलब्ध हाेणाऱ्या पाण्याचा एकत्रित विचार केल्यास दुष्काळाच्या झळा निश्चितच कमी हाेऊ शकतात. या स्रोतांमुळे सध्याच्या पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेवरील बोजा कमी हाेणार अाहे. नैसर्गिक स्रोत अडचणीच्या काळात हक्काचे म्हणून कामी येतात. मात्र, दुर्दैवाने या स्रोतांकडेच अडचण म्हणून बघितले जात असल्याने त्यांची दुरवस्था झालेली दिसते.

अहिल्यादेवी हाेळकरांनी बांधले सर्वाधिक बारव : मंदिरपरिसरात यात्रा भरण्याची प्रथा पूर्वपार चालत अालेली अाहे. अशा यात्रा स्थानांवर प्राचीन काळात स्नानकुंडे अाणि बारव बांधण्यात अाली अाहेत. पूर्वी मंदिर उभे करताना जवळपासच्याच जागेतील दगडांचा वापर केला जात असे. हे दगड काढल्यानंतर जाे खाणीचा खड्डा पडत असे, तेथे जिवंत झरे लागल्यास त्याचे रूपांतर बारवेत केले जात होते. सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिराजवळ अशा प्रकारच्या एका कुंडाचे अवशेष आजही दिसतात. यादव काळात बारव बांधण्याचा प्रघात सुरू झाला. तत्पूर्वी चालुक्य आणि राष्ट्रकुट काळातही बारव बांधण्यात अाल्याचे संदर्भ इतिहासात सापडतात. त्यानंतर अडीचशे वर्षांपूर्वी अहिल्यादेवी हाेळकर यांच्या काळात सर्वाधिक बारव बांधण्यात अाले. दूरदृष्टी ठेवून धार्मिक ठिकाणांच्या जवळपास तयार केलेले हे पाण्याचे बारव आजही अनेकांचे जीवन समृद्ध करीत आहेत. नाशिक िजल्ह्यातील बहुसंख्य बारव हाेळकरांच्या काळातीलच अाहेत.
‘पीटीसी’तीलबारव सुस्थितीत : पाेलिसट्रेनिंग सेंटर येथील बारव सध्या सुस्थितीत अाहे. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या बारवचे नुकतेच पूजनही झाले अाहे.

१९७२च्या दुष्काळात विहिरींनीच तारले : वर्षानुवर्षेपाण्याचा निरंतर स्रोत बनलेल्या पुरातन विहिरींनी १९७२ मधील दुष्काळात नागरिकांना जीवनदान दिले हाेते. त्यामुळे पाण्याचे हे स्रोत जिवंत ठेवण्याची गरज अाहे. धाेकादायक ठरू पाहणाऱ्या विहिरींना वरून बंदिस्त करून प्रसंगी त्यांचा पाण्यासाठी वापर हाेऊ शकेल.

२६ विहिरीपालिकेच्या मालकीच्या आहेत.
१२२ विहिरीखासगी मालकीच्या अाहेत.

विहिरी अाणि बारवांची अाजची स्थिती
{ जलस्रोत बंद झाले वा मंदावले अाहेत.
{ केरकचऱ्याने विहिरी बारवा बुजल्या जात अाहेत.
{ उपसा नसल्याने पाण्याला हिरवट रंग आला आहे.
{ स्वच्छतेअभावी येते पाण्याला दुर्गंधी.
{ प्रदूषणाने टोकाची पातळी गाठली अाहे.

नांदूर परिसरातील बारवा सुस्थितीत
नांदूर भागातील दाेन बारवा अाजही सुस्थितीत अाहेत. जनार्दन स्वामी अाश्रमाच्या पूर्व बाजूला नांदूर नाक्याजवळ असलेल्या या बारवांना बारमाही पाणी असते. पूर्वी ते पिण्यासाठी वापरले जाई, तसेच शेतीसाठीही या पाण्याचा वापर हाेत असे.
बातम्या आणखी आहेत...