आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एेन टंचाईतही गळती अन‌् अपव्यय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यंदा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही महापालिका प्रशासनाच्याच दुर्लक्षामुळे शहरात ठिकठिकाणी पाणीगळती अन् अपव्यय सुरूच असल्यामुळे राेजच लाखोे लिटर पाणी वाया जात असल्याच्या तक्रारी ‘डी. बी. स्टार’कडे अाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत पाहणी केल्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती सुरू असल्याचे दिसून अाले. तर, अनेक ठिकाणी अाजही नळांना ताेट्या नसणे, पाणी भरून झाल्यानंतरही नळ सुरूच ठेवणे, अंगणात सडा मारणे, वाहने धुणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याचे दिसून अाले. अनेक हॉटेल व्यावसायिकांकडूनही इतर कामांसाठी पिण्याच्या पाण्याचाच वापर केला जात असल्याचे धक्कादायक चित्र ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून आले. या संदर्भात नागरिकांकडून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्याकडे सर्रास दुर्लक्षच केले जात असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे.
महापालिकेने नेमलेली विशेष पथके केवळ कागदावरच
शहरातठिकठिकाणी फिरल्यानंतर पाण्याचा कमी-जास्त वापर हाेत असल्याचे लक्षात येते. या पार्श्वभूमीवर जितकी गरज अाहे, ती अाेळखून व्हॉल्व्हमनला पाणीपुरवठा नियंत्रित करण्याच्या सूचना देण्यात येत अाहेत. याबराेबरच पाण्याचे प्रश्न साेडविण्यासाठी विभागीय अधिकारी तांत्रिक कर्मचाऱ्यांची पथकेही निर्माण करण्यात अाली अाहेत. मात्र, ही पथके अद्यापही कागदावरच असल्याचे दिसून येते.

शाळा,हाॅटेल्स, सार्वजनिक ठिकाणी असेही वाया जातेय पाणी
अनेक शाळांमधील मध्यान्ह भोजनानंतर नळ सुरू ठेवून ताटे धुणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पाणी वाया जात असतानाही शाळा प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून येते. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पंचतारांकित हॉटेल्स, ढाबे आदी ठिकाणीदेखील सर्रासपणे ग्लासभर पाणी घेतल्यानंतर घाेटभर पाणी घेऊन उर्वरित पाणी फेकून देण्याचे प्रकार घडतात. अशा प्रकारांवर संबंधित हाॅटेल, ढाबाचालकांनी अंकुश ठेवणे गरजेचे अाहे. ग्राहकांना पाणीबचतीबाबत अावाहन करणे गरजेचे अाहे. जेणेकरून पाण्याची नासाडी हाेणार नाही.

सिडकोभागातही गळती; नागरिकांत जनजागृतीची गरज
सिडकोत पवननगर परिसरातील अनेक ठिकाणी घरातील नळ खुले असल्यामुळे तर अनेक ठिकाणी गळती सुरू असल्यामुळे रस्त्यांवर पाण्याचे पाटच वाहत असल्याचे दिसून येते. सिडको परिसरात अनेक ठिकाणी जलवाहिनीला लागलेली गळती वा नादुरुस्त व्हॉल्व्ह यामुळे दररोज सकाळी हजारो लिटर पाणी वाया जात असल्याच्या तक्रारी अाहेत. पालिकेकडून नागरिकांचे प्रबाेधन हाेण्याची गरज व्यक्त केली जात अाहे.

पाणी जपून वापरण्याची गरज..
^सध्या प्रत्येक नागरिक पाण्याचा वापर काटकसरीने करत आहे. मात्र, हॉटेल इतर ठिकाणी माेठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचा वापर भांडे धुण्यासाठी केला जात आहे. अशा प्रकारे हाेणाऱ्या पाण्याच्या अपव्ययाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. -मोहसीन खान, नागरिक

महापालिकेने लक्ष द्यायला हवे...
^शहरातिकत्येकनागरिकांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत असताना हॉटेल व्यावसायिकांकडून भांडे वा अन्य वस्तू धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केला जात असल्याचे दिसते. याकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. - कल्पेश कर्वे, नागरिक

जितेंद्र एम. पाटोळे, उपअभियंता,पाणीपुरवठा
ठक्कर बाजार स्थानकातही गळती; बेजबाबदारीचा फटका
ठक्कर बाजार बसस्थानकावर प्रवासी कर्मचाऱ्यांकडून पाण्याच्या बाटल्या भरल्यानंतरही नळ सुरू ठेवणे, तोंड-हात-पाय धुण्यासाठीही पिण्याच्याच पाण्याचा वापर करणे, याबराेबरच नळ सुरू ठेवण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसून येते. एसटी प्रशासनाने या ठिकाणी पाणीबचतीचा एकही फलक लावला नसल्याने प्रशासनाची उदासीनता स्पष्ट हाेते.

रेल्वे स्थानकावर हाेताेय प्रवाशांकडून अयोग्य वापर
स्थानकावर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाच ते सहा ठिकाणी प्लास्टिक प्रेशर नळाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होण्याचे प्रमाण कमी असले, तरीही बऱ्याच ठिकाणी खराब नळ असल्यामुळे पाण्याची गळती सुरू आहे. तसेच, प्रवासी कर्मचाऱ्यांकडूनही पाण्याचा वापर योग्य पद्धतीने केला जात नसल्याचेही िदसून येते.

सार्वजनिक स्वच्छतागृहांतील नळांच्या दुरवस्थेकडे काणाडाेळा
सार्वजनिक नळकोंडाळी, सार्वजनिक शौचालये स्वच्छतागृहांबरोबरच विविध शासकीय कार्यालयांतील स्वच्छतागृहांमधील नळ नादुरुस्त असणे किंवा नळ चोरीला जाण्यामुळे त्या ठिकाणी रात्रंदिवस पाणीगळती होत असते. मात्र, त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष िदले जात नाही. त्यातून साधारणत: मिनिटाला एक लिटर अशा वेगाने पाणी वाया जाते. परंतु, अद्यापपर्यंत तरी हे पाणी वाचविण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून आले अाहे. यावरून प्रशासनाची पाणी वाचवण्याविषयीची
उदासीनताच अधाेरेखित हाेते.

दंड वसुलीकडेही पाठच
शहरात पाण्याच्या नासाडीचे प्रकार थांबत नसल्याने माेठा दंड ठाेठावण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीवर सादर केला होता. यात पाण्याची नासाडी करताना काेणी िदसल्यास दोन हजार रुपये दंड केला जाणार होता. त्यानंतर पुनरावृत्ती झाली की, हजारांपर्यंत दंड हाेणार होतो. दंड भरेपर्यंत नळाची जाेडणी खंडित करण्यात येणार होती. तर कायमस्वरूपी असा प्रकार घडल्यास कायमस्वरूपी नळजाेडणी बंद हाेणार होती. मात्र, अद्याप शहरातील एकाही हॉटेल व्यावसायिकावर किंवा नागरिकावर अशी कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. तर दंड वसुलीकडेही अधिकाऱ्यांनी पाठच फिरवल्याचे दिसून येत आहे.

येथे संपर्क साधण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.
{नाशिक पूर्व : ९४२३७७७१२५
{नाशिक पश्चिम : ९४२३१३१३२१
{ पंचवटी विभाग : ९४२३१ ७९१२६
{नाशिकराेड विभाग : ८२७५०१५३९१
{नवीन नाशिक विभाग : ७५८८०३८५८१
{सातपूर विभाग : ९४२३१७९१२१

तक्रारीसाठी पालिकेने दिलेले क्रमांक
नागरिकांना कुठेही पाण्याचा अपव्यय दिसला की, त्याबाबतची माहिती त्वरित कळविण्याचे अावाहन महापालिकेतर्फे करण्यात अालेले अाहे.

‘टँकर'मधून हाेते माेठ्या
प्रमाणावर पाणीगळती
जीपीआेजलकुंभ येथे पाणी भरण्यासाठी येणाऱ्या अनेक टँकरमधून सातत्याने गळती हाेत असल्याने माेठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी हाेते. अनेकदा टँकर भरल्यानंतर वेळीच व्हाॅल्व्ह बंद केल्यास पाणी वाया जाते. तसेच, टँकरचा नळ याेग्यरीतीने बंद हाेत नसल्यासही रस्त्याने पाणी सांडते. तसेच, टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या भागांतही चालकांच्या दुर्लक्षामुळे माेठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे दिसून येेते.

हाॅटेलांमध्ये पिण्याचे पाणी
थेट भांडी धुण्यासाठी...

अनेकहॉटेल्स, मॉल्समध्ये अाजही वापरण्यासाठी, तसेच वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचाच वापर हाेत अाहे.छोटी-मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स मॉल्समध्ये रात्री उशिरा कामगारांकडून पिण्याच्या पाण्याचाच वापर करून सर्रासपणे भांडी, फर्शी वा अन्य साहित्य धुण्याची कामे चालत असल्याचा प्रकारही ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत िदसून अाला. एेन टंचाईत अशा प्रकारांवर प्रशासनाकडून कारवाई हाेत नसल्याने अनेकांनी अाश्चर्य व्यक्त केले अाहे.
अत्यल्प पर्जन्यमानामुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकणारे नागरिक असे चित्र एकीकडे बघावयास मिळत असले, तरी दुसरीकडे विनाकारण पाण्याची नासाडी, ताेट्या नसलेल्या नळांमुळे वाया जाणारे पाणी, टँकर वा जलकुंभांतून हाेणारी गळती असे िवदारक चित्रही अनेक ठिकाणी बघावयास मिळत अाहे. िवशेष म्हणजे, केवळ पाणीकपात करण्यातच धन्यता मानणाऱ्या प्रशासनाकडून याेग्य िनयाेजन वा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई हाेत नसल्याने शहरात पाणीटंचाईचे सावट अधिक गडद हाेत चालले अाहे. किरकोळ गळतीपासून माेठ्या प्रमाणावरील अपव्ययामुळे रोजच लाखो लिटर पाण्याचे अक्षरश: पाटच वाहत असल्याचे ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत दिसून अाले अाहे. त्यावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...
महापालिका प्रशासनाकडून केवळ पाणीकपातीतच मानली जातेय धन्यता; नियाेजन, कारवाई करण्यात मात्र उदासीनताच
{ पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहे?
-पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथके नेमण्यात अाली आहेत. या पथकांमार्फत कारवाई केली जात आहे.
{शहरातील हॉटेल व्यावसायिकांकडून सर्रासपणे पिण्याच्या पाण्याचा वापर भांडे धुण्यासाठी केला जात आहे, त्याचे काय?
-शहरातील हॉटेल व्यावसायिकांनाही पाण्याचा वापर काटकसरीने करावा, यासाठी प्रबोधन केले जात आहे. तर काही हॉटेलमध्ये बोअरवेल करण्यात अाले असल्याने त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. मात्र, अपव्यय करणाऱ्यांवर निश्चितच कारवाई करू.
{सध्या काही भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, त्या टँकरमधूनही हजारो लिटर पाणी वाया जाते. त्याचे काय?
-टँकरचे व्हॉल्व्ह टाकी दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. दुरुस्ती झाल्यानंतर पाणी वाया जाणार नाही.