आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात महिन्यांपासून पाणीपट्टी बिलांचे वाटपच झालेले नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काही महिन्यांपूर्वी तत्कालीन अायुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेच्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांची एका विभागीय कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली केली. मात्र, घरपट्टी पाणीपट्टी विभागाचे अनेक कर्मचारी बदली झाल्याच्या ठिकाणी रुजूच झाले नसल्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून पट्ट्यांचे वाटपच होत नसल्यामुळे करवसुली थांबल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट असताना त्याचा संपूर्ण भार पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या माध्यमातून येणाऱ्या करावर असताना या विभागामार्फत शहरातील सहाही विभागांत सात महिन्यांपासून पट्ट्यांचे वाटपच होत नसल्यामुळे करवसुली थांबली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व विभागांतील अधिकारी कर्मचाऱ्यांची बदली केली होती. या बदल्या झाल्यानंतर काही विभागातील कर्मचाऱ्यांची बदली विभागीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. तर काही कर्मचाऱ्यांना विभागीय अधिकाऱ्यांनी रुजू करण्याचे आदेशच दिले नाही. यामुळे काही विभागातील कर्मचारी मूळ जागेवरच राहिले. परिणामी काही विभागीय कार्यालयांत कर्मचारी कमी पडले आहे. याचाच परिणाम म्हणून घरपट्टी-पाणीपट्टी वाटप रखडले असल्याचे दिसून येत अाहे.

सहाही विभागांत समस्या
सहाही विभागांत घरपट्टी पाणीपट्टी विभागातच अनेक कर्मचारी रुजू झालेले नसल्यामुळे त्याचा परिणाम करवसुलीवर होत आहे. तसेच कर्मचाऱ्यांअभावी सात महिन्यांपासून बिलांचे वाटपच झालेले नसल्याचीही धक्कायक बाब समोर आली आहे.
बातम्या आणखी आहेत...