आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंडदानासाठी तरी रामकुंडावर पाणी द्या, पुराेहित संघाचे पालिका अायुक्तांकडे अार्जव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठवाड्याला पाणी साेडल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून गाेदावरी प्रवाहित ठेवण्यासाठीही महापालिका प्रशासनाकडे पाणी शिल्लक नसून, रामकुंडासारखे मुख्य पात्रही काेरडेठाक पडल्यामुळे पिंडदानासाठी तरी पाणी द्यावे, अशी मागणी गंगा-गाेदावरी पंचकाेटी पुराेहित महासंघाने अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्याकडे केली. पाणी नसल्यामुळे धार्मिक विधींवर परिणाम हाेत असून, लांबून येणारे भाविकही नाराज हाेऊन परतत असल्याची कैफियतही मांडण्यात अाली.

मराठवाड्याला पाणी साेडल्यामुळे शहरात ३० टक्के पाणीकपात सुरू असून, जेथे पिण्यासाठीच माेठ्या मुश्किलीने पाणी उपलब्ध हाेत अाहे, तेथे धार्मिक विधी अन्य कारणासाठी पाणी देणार कसे, हा प्रश्न प्रशासनापुढे अाहे. दुसरीकडे, धरणातच पाणी नसल्यामुळे गाेदावरी नदी काेरडीठाक पडू लागली अाहे. गाेदावरीत अनेक ठिकाणी पाणी अाटले असून, गेल्या काही वर्षांत प्रथमच गाेदावरीच्या तळाचे नाशिककरांना दर्शन घडत अाहे. मुख्य म्हणजे, गाेदावरीला धार्मिक पर्यटनाचे अधिष्ठान असून, पाणी नसल्यामुळे या सर्वांवर परिणाम झाला अाहे. गाेदावरी तीरावर रामकुंड येथे केवळ नाशिकच नाही तर परराज्यातील भाविकही येत असतात. खासकरून पिंडदान, श्राद्धविधीही गाेदातीरावर हाेत असल्यामुळे या सर्वांसाठी स्नानापासून तर निर्माल्य विसर्जनाकरिता नदीत पाणी असणे महत्त्वाचे असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रामकुंडच अाटल्यामुळे वर्षानुवर्षे विधी करणाऱ्या पुराेहित संघाने नाराजी व्यक्त केली अाहे. रामकुंडावर काेणत्याही पर्यायाने का हाेईना पाणी देणे महत्त्वाचे असून, त्यासाठी अायुक्तांना साकडे घालण्यात अाले. यावेळी पुराेहित संघाचे चंद्रशेखर पंचाक्षरी, प्रतीक शुक्ल, अमित गायधनी, अलाेक गायधनी अादींसह पदाधिकारी उपस्थित हाेते.

चार पर्याय, मात्र निर्णय लाेकांवर
रामकुंडात पाणी अाणण्यासाठी बाेअरच्या प्रस्तावाला पर्यावरणप्रेमींचा विराेध अाहे. अाता अाणखी तीन पर्याय असून, त्यात गाेदावरीचे काँक्रिटीकरण काढले तर खालील जिवंत झऱ्यांचे पाणी नदीपात्रात येईल, अशी एक मागणी अाहे. मागील गांधी तलाव वा अहिल्याबाई हाेळकर पुलाच्या रामवाडीकडील भागातील पाणी रामकुंडात साेडावे, अशी सूचना अाहे. तसेच पालिकेने जलवाहिनी अाणून पाणी साेडावे बाजूच्या विहिरीचे पाणी येथे टाकावे, असे पर्याय अाहेत. मात्र, यातील काेणताही पर्याय निवडला तर त्यास अाक्षेप येण्याची शक्यता लक्षात घेत अायुक्तांनी सर्वानुमते एक अंतिम करावा, असे स्पष्ट केले.