आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकीकडे पाणीबचतीचा संदेश, तर दुसरीकडे खुलेआम नासाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - नाशिक शहरात एकीकडे प्रशासनाकडून पाणीबचतीचा संदेश दिला जातोय, तर दुसरीकडे शासकीय कार्यालये काही बेजबाबदार नागरिकांकडून सर्रासपणे पाण्याचा अपव्यय सुरू आहे. या सर्व प्रकारांबाबत प्रशासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारची कडक कारवाई सुरू करण्यात आलेली नाही. केवळ आदेश आल्याशिवाय काम केले जात नसल्याचा प्रकार सिडको विभागात दिसतो आहे.
सिडको विभागात सर्वात जास्त पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिक, सामजिक कार्यकर्ते सामाजिक संस्थांनी केला आहे. काही बेजबाबदार नागरिक वाहने धुण्यासाठी, सडा टाकण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करतात. सिडकोतील कोणत्याही गल्लीबोळात गेल्यास या ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी दिसते. त्यामुळे सिडकोत दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अंबडएमआयडीसीत पाण्याचा गैरवापर : अंबडएमआयडीसीत पाण्याचा गैरवापर सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांवर कारवाई केली जाते, अशा कंपन्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे. अनेक ठिकाणी कंपन्यांंमध्ये वापरले जाणारे पाणी थेट रस्त्यावर सोडले जात आहे. तेथील उद्यानांतही पाण्याचा भरमसाठ वापर केला जातो.

नळजोडणीलावीज मोटार : सिडकोभागात अनेक नागरिकांनी नळजोडणीला विजेच्या मोटारी लावल्या आहेत. दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पाणी जाण्यासाठी त्याचा वापर केला जातो. या वीज मोटारींमुळे आजूबाजूच्या नागरिकांना पाणी मिळत नाही किंवा कमी दाबाने मिळते. मागील वर्षी अनेक नागरिकांच्या घरात तपासणी करून वीज मोटारी जप्ती केल्या होत्या. या वर्षी पुन्हा अशी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सिडको प्रशासकीय कार्यालयात शासनाची वाहने धुण्यासाठी पाण्याचा असा अपव्यय होत अाहे. त्यामुळे अशा प्रकारांना जबाबदार असणाऱ्यांंवर कारवाई होईल का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

अंबड एमआयडीसीत अनेक कंपन्यांकडून पाण्याचा अपव्यय सुरू आहे. उद्यानांसाठी वाहने धुण्यासाठी पाणी वापरले जाते. अनेकवेळा हे पाणी रस्त्यावर साचल्याने रस्त्यावर पाणीच पाणी दिसून येते.

जपून वापर गरजेचा
^पाणी हेचजीवन आहे हे ब्रीदवाक्य आपण शिकत आलोय, त्यासाठी पाण्याचा जपून योग्य वापर व्हायला हवा. अनिल चांदवडकर, सामाजिक कार्यकर्ते

लवकरच मोहीम राबविणार
^पाणी जपूनवापराले जावे याबाबत आम्ही प्रबोधन करीत आहोत. त्यासाठी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. मात्र, पाण्याचा गैरवापर वा अपव्यय केला जात असेल, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. लवकरच तशी मोहीम राबविण्यात येणार आहे. आर. आर. गोसावी, विभागीय अधिकारी

स्मार्ट मीटर बसवावे
^मुंबईच्या धर्तीवर नाशिकमधेही स्मार्ट वॉटर मीटर बसवावे. त्यामुळे अपव्यय करणाऱ्यांनाच त्याचा आर्थिक भुर्दंड बसेल. मनोहर काळे, सामाजिक कार्यकर्ते

जनप्रबोधन केले जाईल
^आम्ही सोमवारपासून पाणीबचतीबाबत नागरिकांचे जनप्रबोधन करणार आहोत. त्याबाबत पत्रके वाटणार आहोत. कांचन पाटील, सभापती,सिडको
प्रशासकीय कार्यालयात धुतली जातात वाहने
सिडको प्रशासकीय कार्यालयात सिडको प्रशासकांची शासनाची वाहने धुण्यासाठी पाण्याचा अपव्यय केला जात असल्याची स्थिती आहे. नळ्या लावून येथे सर्रास वाहने धुतली जातात. याबाबत नागरिकांनी कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात प्रशासक कांचन बोधले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या रजेवर असल्याचे सांगण्यात आले.