आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Shortage In Industrial Area Due To Drought Conduction Nashik District

उद्योगांची पाणी कपात करा - आ. धनराज महाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिंडोरी - सर्वत्र दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यास प्राधान्य दिले पाहिजे त्यासाठी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, याधर्तीवर औद्योगिक वसाहतींचे पाणी त्वरित कपात करा अशी सूचना आमदार धनराज महाले यांनी केली आहे.

दिंडोरी येथे पंचायत समितीच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार धनराज महाले होते, तर उपविभागीय आयुक्त मुकेश भोगे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, तहसीलदार मोहन कनोजे, गटविकास अधिकारी आर. झेड. मोहिते, पंचायत समिती सभापती खंडेराव गोतरणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी गटानुसार गावातील सरपंचांकडून गावच्या पाण्याबाबत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या वेळी अनेकांनी गावातील अपूर्ण पाणीयोजनेबाबत तक्रारींचा पाढा वाचला. या वेळी पंचायत समिती सदस्य गणेश शार्दुल यांनी साखळीबंधारे उभारून पाणी साठवणूक केली पाहिजे असे सांगितले, बैठकीस तालुक्यातील सरपंच, तलाठी उपस्थित होते.

चारा छावण्या उभारा
तालुक्यात शेतीसाठी पाणी नसल्याने चाºयाचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. चाराच उपलब्ध नसल्याने शेतकºयांना जनावरे विकण्याची वेळ आली आहे. त्यासाठी प्रशासनाने चारा छावण्या उभाराव्या जेणेकरून तालुक्यातील पशुधन जगेल अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी केली आहे.

अधिका-यांची बैठकीस दांडी
पाणी हा नागरिकांचा जीवन-मरणाचा प्रश्न असूनही पाणीटंचाई आढाव बैठकीस निसर्ग तांत्रिक सल्लागार, भूजल सर्वेक्षण अधिकारी, जीवनप्राधिकरण अधिकारी व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांसह पंचायत समितीचे उपसभापती भास्कर भगरे शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद गटनेते प्रकाश वडजे यांसह अनेक लोकप्रतिनिधींनी बैठकीस दांडी मारली.

या गावांमध्ये आहे पाणी टंचाई
खोरीपाडा, दिंडोरी, संगमनेर, चौसले, पंडाणे, महाजे, सादराळे, कोल्हेर, मोहाडी पिंपळनारे, मांदाणे, धागूर, रावळगाव, लोखंडेवाडी, जोपूळ, जऊळके दिंडोरी, दहवी, विळवंडी, माळे दुमाला, अम्बेगन आदी गावांमध्ये पाणी टंचाई असल्याचे टँकर सुरू करण्याची मागणी बैठकीत केली.

..तर टँकर सुरू करण्यात येतील
- सद्य परिस्थितीत ज्या गावांना पाणीटंचाई आंहे, तेथे टंचाई उपाययोजना राबविण्यात येतील. गावाच्या दीड कि.मी. अंतराच्या आतील विहिरी अधिग्रहीत करून पाणीटंचाई दूर न झाल्यास टँकर सुरू करण्यात येतील. मुकेश भोगे, उपविभागीय अधिकारी, दिंडोरी
पंचायत समितीचा कारभार जोकरसारखा सुरू आहे
बैठक सुरू असताना नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना गटविकास अधिकारी यांना उत्तरे देता आली नाहीत. बैठक सुरू असताना गटविकास अधिकारीसारखे मोबाइलशी खेळत होते, तर अनेक अधिकारीही बैठकीस अनुपस्थित असल्याने आमदार धनराज महाले चांगलेच संतापले. त्यांनी गटविकास अधिकाºयांना धारेवर धरत जोकरसारखा कारभार थांबवा असे खडसावले. त्याचबरोबर आपण अधिकारी आहात, येथे काही सर्कस चालू नाही असे म्हणत अधिकाºयांवर
आपला वचक नसल्याने नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हणत त्यांची चांगलीच कानउघडणी केली.