आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\"त्या\' २४ गावांमध्ये होणार पाणीपुरवठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अकोला जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या एप्रिल ते जूनपर्यंतच्या कृती आराखड्यानुसार मूर्तिजापूर तालुक्यातील २४ गावांसाठी विविध प्रकारे उपाययोजना करून पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी एकूण ७८ लाख रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा विभागाद्वारे गावनिहाय लोकसंख्येप्रमाणे विविध योजना तसेच अस्तित्वात असलेल्या उपाययोजना प्रस्तावित केलेल्या उपाययोजनांनुसार कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये नळ योजना, हातपंप, वीजपंप, सार्वजनिक खासगी विहिरी, टँकर, बैलगाडी आदी माध्यमातून पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तालुक्यातील बिडगाव येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहिरी, बोरगाव येथे नळ योजना, हातपंप, वीजपंप, सार्वजनिक विहिरी, खासगी विहीर, धामोरी बुद्रूक येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहिरी, गाजीपूर येथे नळ योजना, हातपंप, जितापूर खेडकर येथे हातपंप, सार्वजनिक विहिरी, खासगी विहिरी, नवसाळ येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहिरी अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत.

एंडली येथे नळ योजना, हातपंप, मोहखेड येथे नळयोजना, हातपंप, सार्वजनिक विहिरी, साखरी येथे नळ योजना, हातपंप, वीजपंप, अकोली जहागीर येथे हातपंप, सार्वजनिक विहिरी, चिखली येथे ११ हातपंप, कादवी येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहीर, कासवी येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहीर, सोनोरी मूर्तिजापूर येथे नळ योजना, १४ हातपंप, सार्वजनिक विहिरी, उमरी अरब येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहिरी, खासगी विहिरी, लंघापूर येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहिरी, वहितपूर येथे नळ योजना, हातपंप, धानोरा वैद्य येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहीर, बोर्टा येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहिरी, खासगी विहिरी, जांभा बुद्रूक येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहीर अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. माना येथे नळ योजना, ३२ हातपंप, सार्वजनिक विहिरी, नागोली येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहीर, किन्ही येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहीर, धोत्रा शिंदे येथे १५ हातपंप, सार्वजनिक विहिरी, दहातोंडा येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहिरी, दातवी येथे नळ योजना, हातपंप, हिवरा कोरडे येथे नळ योजना, हातपंप, राजुरा सरोदे येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहिरी, राजुरा घाटे येथे नळ योजना, हातपंप, सार्वजनिक विहीर, सिरसो येथे नळ योजना, ४७ हातपंप, १७ सार्वजनिक विहिरी, १५ खासगी विहिरी, कुरूम येथे नळ योजना, ११ हातपंप, १० सार्वजनिक विहिरी अशा उपाययोजना करण्यात येणार आहे.
तालुक्यातील या गावांच्या एकूण ४८ हजार ८८ लोकसंख्येनुसार ३० नळ योजना, २४८ हातपंप, वीजपंप, ८२ सार्वजनिक विहिरी, २६ खासगी विहिरी अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रस्तावित योजनांमध्ये फारसे नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या आराखड्यानुसार ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासंदर्भात अद्यापपर्यंत नियोजन नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

प्रस्तावित योजनांमध्ये फारसे नियोजन नसल्याचे दिसून येते. एप्रिलच्या आराखड्यानुसार ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासंदर्भात अद्याप नियोजन नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

प्रस्तावित केलेल्या उपाययोजना अशा
प्रस्तावित गावे २४
विहीर अधिग्रहण १३
टँकर, बैलगाडीद्वारे पाणी ११
नळ योजना विशेष दुरुस्ती
तात्पुरती पूरक नळ योजना
विंधन विहीर विशेष दुरुस्ती ३२
नवीन विंधन विहीर दुरुस्ती ११
एकूण खर्च ७८.०८
एकूण उपाययोजना ७८