आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात आजपासून दोन वेळा पाणीपुरवठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पावणे दोन महिन्यांपासून एक वेळा पाणीपुरवठ्यामुळे शहरवासीयांचे होणारे हाल अाता थांबणार असून, महापौर अॅड. यतिन वाघ यांनी स्थायी समिती सभापती व नगरसेवकांचा पाठपुरावा लक्षात घेत रविवारपासून दोन वेळा पाणीपुरवठा सुरू होईल, असे जाहीर केले.

७ जुलै रोजी नाशिक शहरात गंगापूर धरणातील जलसाठा घटल्यामुळे पाणी कपात लागू झाली. २२ जुलै रोजी गंगापूर धरणात ८० टक्के पाणीसाठा झाल्यावर पूर्ण क्षमतेने पाणी देण्याच्या कारणाखाली एक वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे ज्यांच्याकडे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाही त्यांचे हाल होत असल्याची तक्रार उपमहापौर सतीश कुलकर्णी व स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी केली होती.

गंगापूर धरणाच्या जलपूजनानिमित्ताने नगरसेवक पुन्हा एकदा आक्रमक झाल्यावर कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना महापौरांनी रविवारपासून शहरात दोन वेळा पूर्ववत पाणीपुरवठा होईल, अशी अधिकृत घोषणा केली. या वेळी सभापती ढिकले, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. पवार आदी उपस्थित होते.
माेबाइलवर धडकले संदेश

दाेन वेळच्या पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर बहुतांश नगरसेवकांनी तातडीने अनेकांना माेबाइलवरून संदेश पाठवून ही अानंदाची वार्ता पाेहचविली. अर्थात यात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांचाच अधिक सहभाग हाेता. दरम्यान, प्रशासनाच्या निर्णयामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पून्हा बदलण्याची शक्यता अाहे. यापुढे काेणत्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा हाेताे, याकडे अाता नागरिकांचे लक्ष लागून अाहे.

सर्वपक्षीय दबावामुळे निर्णय
जलपूजनाच्या कार्यक्रमापूर्वी शिवसेना विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, अपक्ष आघाडीचे गटनेते गुरमित बग्गा यांंच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी महापौरांशी चर्चा करून दोन वेळा पाणीपुरवठ्याचा निर्णय घेण्याची मागणी केली. यापूर्वी ढिकले यांनी दोन वेळा पाणीपुरवठ्यासाठी केलेले प्रयत्न व स्थायी समिती सभेत दिदलेले आदेश यावरून मनसेतील राजकारणही चर्चेत आले होते. दरम्यान, त्यास सर्वपक्षीयांची जोड मिळाल्यावर महापौरांनी दोन वेळा पाणी देण्यावर शिक्कामोर्तब केले.