नाशिक - द्वारका परिसरात गेल्या काही दिवसापासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी प्राशन केल्याने आरोग्याचा तक्रारी वाढू लागल्या आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर उपाययाेजना करण्याची मागणी करण्यात येत अाहे.
द्वारका परिसरातील काठेगल्ली, शंकरनगर, तिगरानीया रोड, तपाेवन रोड, तसेच जुने नाशिक परिसरात भागात गेल्या आठ दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी पिल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या पोटदुखी, डोकेदुखी, ताप येणे अशा आरोग्याचा तक्रारी वाढू लागल्या आहे. विशेषत: लहान मुलामध्ये या तक्रारी वाढू लागल्याने नागरिकांच्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या प्रकाराबाबत तक्रारी करुनही अद्यापपर्यंत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. महापालिका प्रशासनाने तातडीने या परिसरात शुध्द पाणीपुरवठा होईल याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जलवाहिनी बदलण्याची गरज
काठेगल्ली,शंकरनगर परिसरात गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. त्या तुलनेत या भागात पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. तसेच या भागात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जुनी झाली असल्याने ती बदलण्याची गरज असून लाेकप्रतिनीधी याबाबत पाठपुरावा करावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
प्रभागक्रमांक ११ मधील प्रबुद्धनगर परिसरात दूषित पाणीपुरवठा हाेत असल्याने नागरिकांचे अाराेग्य धाेक्यात अाले अाहे. तसेच परिसरातील अवैध मद्य विक्रीमुळे त्रस्त झालेल्या संतप्त महिलांनी रविवारी सकाळी मनसेचे गटनेते सलीम शेख नगरसेवक याेगेश शेवरे यांना त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमाेरच घेराव घालून शुध्द पाणीपुरवठा करण्याची अवैध मद्य विक्री बंद करण्याची मागणी केली.
प्रबुद्धनगर परिसरात दूषित पाणीपुरवठा हाेत अाहे. जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी मिसळले जात असल्याने दूषित पाणीपुरवठा हाेत असल्याचा अाराेप महिलांनी केला. रविवारी सकाळी महिलांनी नगरसेवक सलीम शेख यांच्या संपर्क कार्यालयावर धडक देत शेख शेवरे यांना घेराव घालून शुध्द पाणीपुरवठा करावा प्रबुद्धनगरमधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. शेख यांनी त्वरीत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अरविंद जाधव यांच्याशी संपर्क साधून परिसरातील जलवाहिनी तपासून दूषित पाणीपुरवठा राेखण्यास सांगितलेे. अवैध धंद्याबाबत पाेलिस अायुक्तांशी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले. यावेळी शांताबाई भदरगे, इंदुबाई ठाेके, शांताबाई ठाेके, रंजना निकम, कविता जाधव, नंदा माेरे, सुमनबाई केदार, शांताबाई म्हस्के अादी महिलांचा समावेश हाेता.
प्रशासनाने लक्ष द्यावे
^नागरिकांना स्वच्छपाणी पूरवठा व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. तसेच त्या ठिकाणी गळती असेल त्या ठिकाणांची तातडीने दुरूस्ती करावी. -संजयमहाले, नागरिक
^तीनदिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपूरवठा होत अाहे. याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. -राकेशपाटील, नाशिक