आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्टोबर हिटचा तडाखा; त्यात नाशिककरांना पाणीटंचाईची झळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणात यंदा पुरेसा जलसाठा झाला असला तरी, ऐन ऑक्टोबर हिटच्या तडाख्यात नाशिककरांना पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसत असून, पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वडाळागाव इंदिरानगर परिसरातील महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

इंदिरानगरातील साईनाथनगर, दीपालीनगर, विनयनगर या परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. ऑक्टोबर हिटची चाहूल लागल्याने उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याची गरजही वाढली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानादेखील शहरातील काही भागांमध्ये विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे.

वडाळागाव परिसरात तर रहिवाशांना टँकरचा आधार घेऊन तहान भागवावी लागत आहे. तर, दुसरीकडे इंदिरानगर परिसरातील साईनाथनगर विनयनगर भागातील अनेक ठिकाणी दोन दिवसांपासून पाणीच येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. उन्हाळ्यापूर्वीच सुरू झालेली ही कृत्रिम पाणीटंचाई पालिकेने तातडीने दूर करण्याची मागणी महिलांकडून होत आहे.

पाणीपुरवठा विस्कळित
मागीलचार ते पाच दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने आमची गैरसोय होत आहे. पुरेसा पाणीपुरवठाही होत नसल्याने पाण्याची साठवणूक करता येत नाही. हा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा. अविनाशठाकरे, साईनाथनगर
दूषित पाण्याचीही झाली बाधा
पाणीटंचाईचासामना करावा लागत असताना दुसरीकडे शहरातील काही भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नाशिककरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सातपूर परिसरातील जाधव संकुल परिसरातही असाच दूषित पाणीपुरवठा होत असल्याने साथीचे आजार उद‌्भवण्याची शक्यता आहे. तसेच, पंचवटीतही अशीच स्थिती आहे. त्यामुळे शुध्द पाणीपुरवठ्याची मागणी होते आहे.